AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मणिपूरनंतर आता आणखी एक राज्यात अशांतता, कर्फ्यूमध्ये BSF जवानांवर हल्ला, सैन्य उतरवण्याची वेळ आली

अनेक ठिकाणी जाळपोळ आणि संपत्तीचं नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा पथकांसह सैन्य तैनात करावं लागलय.

मणिपूरनंतर आता आणखी एक राज्यात अशांतता, कर्फ्यूमध्ये BSF जवानांवर हल्ला, सैन्य उतरवण्याची वेळ आली
Indian Army
| Updated on: Mar 12, 2026 | 5:02 PM
Share

ईशान्य भारतातील राज्य मणिपूर आता कुठे शांत होत असताना मेघालयमध्ये हिंसाचार सुरु झाला आहे. बुधवारी संध्याकाळी मेघालयच्या गारो हिल्स क्षेत्रात समाजकंटकांनी BSF जवानांवर हल्ला केला. यात अनेक जवान जखमी झालेत. यावेळी सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) डीआयजीच्या ताफ्यातील एका वाहन सुद्धा पेटवून देण्यात आलं. डीआयजी अन्य अधिकाऱ्यांसह भारत-बांग्लादेश सीमेजवळ पश्चिम गारो हिल्स जिल्ह्यात एका गावात बैठक करुन परतत होते. या हल्ल्याच्यावेळी डीआयजी आणि त्यांच्यासोबत असलेल्या अधिकाऱ्यांना किरकोळ दुखापत झाली. ताफ्याचा भाग असलेल्या एका गाडीला आग लागली.

गारो पर्वतीय स्वायत्त जिल्हा परिषद निवडणुकीवरुन विरोध प्रदर्शन सुरु झाल्यानंतर हा हिंसाचार उफाळला. आंदोलक निवडणुकीत बिगर गारो समुदायाच्या नामंकन प्रक्रियेच्या सहभागाला विरोध करत होते. मंगळवारी चिबिनांग क्षेत्रात झडपा झाल्या. त्यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला. अनेक जखमी झाले.

सैन्याच्या पाच तुकड्या तैनात

या हिंसाचारामुळे गारो पर्वतीय क्षेत्रात अनेक ठिकाणी जाळपोळ आणि संपत्तीचं नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा पथकांसह सैन्याच्या पाच तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. यात तीन तुरामध्ये आणि दोन चिबिनांग क्षेत्रात तैनात करण्यात आल्या आहेत. या हिंसाचारानंतर मुख्यमंत्री संगमा यांनी 10 एप्रिलला प्रस्तावित असलेली GHADC निवडणूक स्थगित केल्याची घोषणा केली आहे.

कर्फ्यू लावला

अफवा रोखण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य सरकारने गारो पर्वतीय क्षेत्रातील पाच जिल्ह्यांमध्ये मोबाईल-इंटरनेट सेवा निलंबित केली आहे. पश्चिम गारो पर्वतीय जिल्ह्यात कर्फ्यू लावण्यात आला आहे. जिल्ह्याचे उपायुक्त वी अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्फ्यू 13 मार्चच्या रात्री 12 वाजेपर्यंत प्रभावी राहिलं. गारो पर्वतीय क्षेत्रातील संवेदनशील भागात अतिरिक्त सुरक्षा पथकं तैनात करण्यात आली आहेत.

Follow Us
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम