मोठी बातमी! रशियाचा भारताला मोठा धक्का; पाकिस्तान, चीनही असं काम करणार नाही, पुतिन यांचा मित्र देशासोबतच मोठा गेम
मोठी बातमी समोर येत आहे, रशिया भारताचं मित्र राष्ट्र आहे, परंतु रशियाने भारताला मोठा धक्का दिल्याचं आता समोर आलं आहे. यामुळे भारताचं प्रचंड नुकसान झालं आहे. रशियाने अचानक भूमिका का बदलली? असा सवालही उपस्थित होत आहे.

अमेरिकेकडून रशियाच्या कच्च्या तेलावर निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच जे देश रशियाकडून कच्चं तेल खरेदी करतात, त्यांच्यावर देखील दबाव टाकण्याचा प्रयत्न अमेरिकेकडून झाला. मात्र भारताने अमेरिकेच्या या दबावाला न जुमानता रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरूच ठेवली आहे. मात्र आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. इराण आणि अमेरिकेमध्ये संघर्ष सुरू असताना मध्य पूर्वेत तणावाची स्थिती निर्माण झाली होती. भारतावर मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं होतं. याच संधीचा फायदा रशियाने घेतला आहे. अमेरिका आणि इराण युद्ध सुरू होण्यापूर्वी रशियाकडून भारताला सवलतीच्या दरात कच्च्या तेलाच्या पुरवठा केला जायचा, परंतु त्यानंतर आता रशियाने ही सवलत तर बंद केलीच आहे, परंतु भारताला प्रिमियम दराने कच्च्या तेलाची विक्री केल्याचं समोर आलं आहे. आखाती देशाच्या तुलनेत रशियामधून भारताने जे कच्चं तेल आयात केलं त्याचे दर हे प्रचंड जास्त होते, असं आता आकडेवारीमधून समोर आलं आहे. 2026 मध्ये भारताने रशियाकडून तेलाच्या खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली. चालू वर्षात भारताने आपल्या एकूण गरजेपैकी रशियाकडून तब्बल 40 टक्के तेलाची खरेदी केली. परंतु त्याचबरोबर रशियाने भारताला हे कच्चं तेल प्रिमियम दराने विकल्यामुळे त्याचा भारताला मोठा फटका बसला आहे.
द हिंदूच्या एका रिपोर्टनुसार भारताने एप्रिल महिन्यानंतर व्हेनेझुएला आणि इराणकडून देखील कच्च्या तेलाची खरेदी सुरू केली आहे. मे 2026 मध्ये भारताने विविध देशांकडून तब्बल 218.2 लाख टन कच्च्या तेलाची खरेदी केली. त्यापैकी रशियाकडून खरेदी करण्यात आलेल्या तेलाचं प्रमाण हे 40 टक्के एवढं होतं. गेल्या दोन वर्षांमध्ये देखील रशियाकडून भारताने एवढ्या प्रमाणात तेलाची खरेदी केली नव्हती. अमेरिकेचा दबाव असताना देखील भारताने रशियाकडून तेलाची खरेदी वाढवली आहे, हे विशेष. मात्र आता रशियाने भारताला प्रिमियम दराने तेलाची विक्री सुरू केल्याने त्याचा मोठा फटका हा भारताला बसत आहे.
आकडेवारीनुसार रशियाकडून या वर्षी भारताने ज्या तेलाची खरेदी केली त्या तेलाचं आयात मूल्य तब्बल 83 टक्क्यांनी वाढलं आहे. याचा मोठा फटका हा भारताला बसताना दिसत आहे. तर दुसरीकडे अमेरिका, आणि व्हेनेझुएला सारख्या देशांकडून भारताने जी कच्च्या तेलाची खरेदी केली त्याची किंमत ही रशियाच्या कच्च्या तेलापेक्षा कमी होती. एकीकडे रशियाने भारताकडून कच्च्या तेलावर प्रिमियम दर वसूल केला आहे, तर दुसरीकडे रशियाने भारताचा शत्रू असलेल्या पाकिस्तानला कमी दरात कच्चं तेल निर्यात करण्याची तयारी दर्शवली होती.