
दीड वर्षांपूर्वी सलग दोन आपत्कालीन मेंदूवरील शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी योग शक्तीच्या चमत्काराची चुणूक दाखवली. त्यांनी या शस्त्रक्रियेनंतर दुचाकीवर कैलाश यात्रा पूर्ण केली. काल कोईम्बतूर येथील ईशा योग केंद्रात परतल्यावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. हा केवळ चमत्कारच नाही तर एक असाधारण शारीरिक सिद्धीच म्हणावी लागेल. आरोग्य आणि ऊर्जा पुन्हा प्राप्त करण्याचा हा जिवंत पुरावाच आहे.
भारतीय संस्कृतीत कैलाश यात्रा ही सर्वात पवित्र यात्रांपैकी एक मानण्यात येते. या परंपरेनुसार, कोईम्बतूर विमानतळावर हजारो भाविकांनी सद्गुरुंचे स्वागत केले. स्थानिक आणि ग्रामीण भागातील त्यांच्या भक्तांनी एकच गर्दी केली. तर स्वयंसेवकांनी ईशा योग केंद्राच्या प्रवेशद्वार ते आश्रमापर्यंतचा रस्ता त्यांनी सजावला. नंतर एक भव्य शोभायात्रा काढण्यात आली.
बॉलिवूड अभिनेता डिनो मोरियासह एका ऑनलाईन चर्चेत सद्गुरुंनी महत्त्वाचा मुद्दा मांडला. ते म्हणाले मी भगवान शंकराला, शिवाला पाहायला जात नाही. माझ्यासाठी शिव ज्या स्थितीत प्रतिनिधीत्व करतात. जेव्हा डोळे बंद करून स्मरण करतो, तेव्हा तोच भाव असतो. मला कैलाशला जाण्याची गरज नाही. कैलाश एक अद्भूत ग्रंथालय आहे. पण मी या दिवशी त्यासाठीही जात नाही.
मी शेकडो लोकांना तिथे घेऊन जात आहे. लोक सकाळी उठल्यावर काय म्हणतात? शिव? नाही. ते स्टॉक मार्केट वा सिनेमा म्हणतात. म्हणून अशा लोकांसाठी उंची आणि विविध आव्हाने त्यांना त्या गोष्टींपासून दूर नेण्यासाठी आणि काही सखोल विषयांवर लक्ष केंद्रित करण्यास मदत करत असल्याचे सद्गुरू म्हणाले.
वैद्यकीय तज्ज्ञांनी म्हणाला दुचाकीवरुन प्रवासास मनाई केली होती. तरीही मी समुद्र सपाटीपासून 18 हजार फूट उंचीवर गेलो. यावरून योग शक्ती कशी काम करते हे समोर येते. योग म्हणजे तुम्ही प्रत्येकामध्ये असलेल्या सृष्टीच्या स्त्रोताशी एक होणे हा आहे. जेव्हा तुम्ही सृष्टीच्या स्त्रोताशी संपर्क साधता, तेव्हा ते आव्हान संपते. मी तर ते सहज केले, अगदी या वयातही असे सद्गुरूंनी स्पष्ट केले.
सहलीचा असा आहे तपशील
सहलीची सुरुवात : गोरखपूर, उत्तर प्रदेश (9 ऑगस्ट, 2025)
हा होता मार्ग : काठमांडू, भक्तपूर, थुलीखेल (नेपाळ) → नेपाळ-तिबेट सीमा → झांगमू, न्यालम, सागा (तिबेट) → मानसरोवर → ट्रेक ते कैलास
मार्गावरील आव्हाने : भूस्खलन, वारंवार पडणारा पाऊस, खडबडीत रस्ते, 15000 ते 20000 फूट उंची
या पवित्र प्रवासादरम्यान, स्थानिक लोकांनी सद्गुरुंचे स्वागत आदरणीय गुरुसारखे केले. यावेळी त्यांनी अभिनेता आर. माधवन क्रिकेटपटू वरूण चक्रवर्ती आणि दिग्दर्शक नाग अश्विन यासारख्या सेलिब्रिटींशी ऑनलाईन संवाद साधला. योग विज्ञान आणि शिव रहस्यांवर त्यांनी ऑनलाईन चर्चा केली.