
विमानातून प्रवास करताना तुम्ही देखील विचार करत असाल की कोणती सीट अधिक सुरक्षित आहे. तर आता एक गोष्ट जाणून तुम्ही हैराण होणार आणि ती म्हणजे विमानातील अधिक सुरक्षित असलेल्या सीटच्या दरात वाढ करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. नुकताच, अहमदाबाद एअर इंडियाच्या अपघाताशी संबंधित एका वृत्तामुळे आणि त्यासंबंधित सोशल मीडिया पोस्टमुळे हा मुद्दा चर्चेत आला आहे. अहमदाबाद एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर या सीटची किंमत आणखी वाढेल असा दावा अनेक पोस्ट करत आहेत. तर जाणून घ्या नक्की काय आहे सत्य?
सांगायचं झालं तर, विमान दुर्घटनेत विमानाचं मोठं नुकसान झालं आहे, तर सीट नंतर 11A बसलेला प्रवाशाचे प्राण वाचले आहेत. ही सीट विंगजवळील एक ओव्हरविंग सीट होती, जी सामान्यतः विमान उद्योगात ‘रचनात्मकदृष्ट्या मजबूत’ मानली जाते.
एवढंच नाही तर 11 डिसेंबर 1998 रोजी 20 वर्षीय थाई अभिनेता आणि गायक रुआंगसाक लोयचुसाक यांनी मृत्यूला मागे टाकलं. जेव्हा थाई एअरवेजचे विमान TG261 दक्षिण थायलंडमध्ये लँडिंग करताना दलदलीत कोसळलं होतं. या अपघातात विमानातील 146 पैकी 101 जणांना आपला जीव गमवावा लागला. रुआंगसाक त्याच विमानात 11A सीटवर बसला होता आणि आज, वयाच्या 47 व्या वर्षी, तो म्हणतो की, तो एक गूढ योगायोग पाहिला आहे.
संबंधित घटनेनंतर प्रवाशांमध्ये अशा जागांबद्दल रस आणि जागरूकता दोन्ही वाढली आहे. विशेष म्हणजे अनेक आंतरराष्ट्रीय अभ्यास आणि क्रॅश विश्लेषण अहवालांमधून असंही दिसून आलं आहे की, विमानाच्या मागील बाजूस किंवा विंगच्या वरच्या जागा तुलनेने सुरक्षित मानल्या जातात.
विमानाच्या रचनेत हा भाग सर्वात मजबूत असतो कारण तो पंखांशी जोडलेला असतो…
आपत्कालीन निर्गमन मार्गाजवळ असल्याने बचावाची शक्यता जास्त असते.
या जागांमध्ये पायांसाठी अतिरिक्त जागा देखील आहे, जी आरामदायी तसेच जलद बाहेर पडण्यास मदत करते.
विमानांमध्ये पायांच्या जागेसाठी किंवा खिडकीच्या सीटसाठी आधीच अतिरिक्त शुल्क आकारलं जात असलं तरी, विमान कंपन्या आता ‘सेफ्टी वैल्यू’ हा एक नवीन चार्जिंग पॉइंट देखील बनवू शकतात. सुरक्षित मानल्या जाणाऱ्या जागा निवडणाऱ्या प्रवाशांकडून अतिरिक्त शुल्क आकारणे हे विमान कंपन्यांसाठी उत्पन्नाचा एक नवीन स्रोत बनू शकते.
काही बजेट आणि प्रीमियम वाहकांनी या जागा ‘सेफ्टी प्रीमियम सीट’ श्रेणीत ठेवण्याचा विचार सुरू केला आहे. आता, तिकीट बुक करताना केवळ खिडकी, आयल किंवा अतिरिक्त पायांसाठी जागाच नाही तर उच्च सुरक्षा क्षेत्र देखील एक पर्याय असू शकतो.