CRPF कोब्रा युनिटच्या पहिल्या महिला IG बनल्या संजुक्ता,2006 च्या बॅचच्या IPS अधिकारी

आसामात नक्षलवादाच्या विरोधात मोहिम चालवण्यात संजुक्ता पाराशर यांची महत्वाची भूमिका राहिली आहे. त्यांना आसामच्या लेडी सिंघम असे म्हटले जाते.

CRPF कोब्रा युनिटच्या पहिल्या महिला IG बनल्या संजुक्ता,2006 च्या बॅचच्या IPS अधिकारी
ips Sanjukta Parashar
| Updated on: Sep 15, 2026 | 10:44 PM

साल २००६ च्या बॅच आयपीएस अधिकारी असलेल्या संजुक्ता पाराशर यांनी सीआरपीएफच्या कोब्रा युनिटच्या आयजी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. CoBRA चा सपूर्ण नाव कमांडो बटालियन फॉर रिझॉल्युशन एक्शन असे आहे. संजुक्ता पाराशर या या पदावर पोहचलेल्या पहिल्या महिला अधिकारी आहेत. CRPF मुख्यालयाने गेल्या आठवड्यात त्यांच्या नियुक्तीचे आदेश जारी केले होते.या संदर्भातील माहिती आज उघड झाली आहे. संजुक्ता आता १९९६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी दानेश राणा यांची जागा घेणार आहेत.

संजुक्ता पाराशर या आसाम-मेघालय कॅडरच्या IPS अधिकारी आहेत. आसामात नक्षलवादाच्या विरोधात मोहिम चालवणे यात त्यांची महत्वाची भूमिका राहिली आहे. त्यांना आसामच्या लेडी सिंघम असे म्हटले जाते.

साल २००८ मध्ये CoBRA संघटनेची स्थापना..

सीआरपीएफने अनेक राज्यात लेफ्च विंग एक्सट्रीमिझ्मशी (LWE) लढण्यासाटी साल २००८-०९ मध्ये कोब्रा टीमची स्थापना करण्यात आली. या युनिटला पूर्वेकडील काही राज्यातील दहशदवादाचा निपटारा करण्याची जबाबदारी देखील सोपवलेली होती. CRPF ने अलिकडे मणिपूरात सशस्र हिंसा रोखण्यासाठी कोब्राच्या दोन युनिटची स्थापना केली होती.

संजुक्ता पराशर यांच्या बहादुरीचे 5 चर्चित किस्से

जातीय हिंसा : साल २००८ मध्ये पहिल्या पोस्टींगच्या काही काळात त्यांना उडालगुडी येथे पाचवलेले गेले. जेथे बोडो आणि अन्य समुदायाच्या दरम्यान जातीय हिंसा सुरु होती. त्यावेळी संजुक्ता पराशर यांनी घटनेवर जाऊन परिस्थिती नियंत्रणात मोठी भूमिका निभावली होती.

AK-47 घेऊन जंगलात संचार : सोनितपुर येथे एसपी असताना त्यांनी CRPF जवान आणि पोलिस कमांडो सोबत दाट जंगलात उग्रवाद्यांविरोधात मोहिमांचे नेतृत्व केले होते. त्यांच्या हातात त्यावेळी AK-47 असायची..

रात्रभर ऑपरेशनचे नेतृत्व : ऑगस्ट २०१६ मध्ये आसाम-अरुणाचल सीमेजवळ पोलिस, सीआरपीएफ आणि आसाम रायफल्सच्या संयुक्त ऑपरेशनचे नेतृत्व केले. ऑपरेशन दरम्यान सुरक्ष दलांवर गोळ्या चालवण्यात आल्या आणि ग्रेनेड फेकले गेले. मोहिमेत NDFB(S) चे तीन उग्रवादी मारले गेले आणि शस्रास्रे जप्त झाली.

एका वर्षात १६ उग्रवाद्यांचा खात्मा : २०१४ – २०१५ च्या दरम्यान संजुक्ता यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या ऑपरेशनमध्ये १६ उग्रवादी मारले गेले. आणि ६४ जणांना अटक झाली. मात्र, अधिकृत आकडेवारी जाहीर केली नाही.

धमक्यानंतरही ड्यूटी : मीडियातील बातमीनुसार उग्रवादी संघटनांनी एकीकडे त्यांनी अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. त्यानंतरही त्यांनी संवेदनशील विभागात मोहिम आणि पोलिस नेतृत्वाची जबाबदारी जारी ठेवली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us