सौरभ दास आक्रमक, थेट न्यायाधीशांवरच हल्लाबोल, म्हणाला, अनेकांनी तर देशाला…

सौरभ दासने न्यायधीशांवर तीव्र टीका करत त्यांनी देशाला धोका दिला असून संविधानाशी प्रतारणा केल्याचा आरोप केला आहे. न्यायपालिकेवर यापूर्वीही त्याने जोरदार हल्ला चढवला होता. आता न्यायधीशांच्या उत्तरदायित्वावर आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहनही केले आहे.

सौरभ दास आक्रमक, थेट न्यायाधीशांवरच हल्लाबोल, म्हणाला, अनेकांनी तर देशाला...
Saurabh Das
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 26, 2026 | 3:44 PM

आठवडाभर तुरुंगात राहिल्यानंतर देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील सीजेपीचा सूर मवाळ झाला आहे. मात्र, सीजेपीचे सहसंयोजक सौरभ दास यांनी न्यायपालिकेबाबत एक मोठं विधान केलं आहे. न्यायाधीशांनी देशाला धोका दिला असून संविधानाशी प्रतारणा केल्याचा आरोप सौरभ दासने केला आहे. यापूर्वी त्याने न्यायपालिकेवर तिखट भाषेत हल्ला चढवला होता. आता पुन्हा एकदा सौरभ दास यांनी न्यायपालिकेला घेरलं आहे.

सौरभ दास यांनी यापूर्वीही न्यायालयावर टीका केली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश स्वर्ण कांता शर्मा यांच्यावर केलेल्या टीकेवरून तर त्यांना अब्रुनुकसानीच्या खटल्याला सामोरे जावं लागलं आहे. दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याचा खटला जस्टिस स्वर्ण कांता शर्मा यांच्या समोर आला होता. त्यावेळी सौरभ दासने त्यांच्यावर असंख्य आरोप केले होते. त्यानंतर अरविंद केजरीवाल आणि आपच्या इतर नेत्यांनीही हेच आरोप केले होते. एवढेच नव्हे तर एसआयआर प्रक्रियेतील कथित गडबडीप्रकरणीही त्याने सुप्रीम कोर्टावर दोषारोप केले होते.

Loading...

आता काय म्हणाला

आता पुन्हा एकदा त्याने न्यायाधीशांवर टीका केली आहे. ‘अकाउंटॅबिलिटी ऑफ जजेज ऑफ द सुप्रीम कोर्ट अँड हायकोर्ट’ या विषयावर मंगळवारी दिल्लीत कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात लोकांनी सहभागी व्हावं असं आवाहन त्याने केलं आहे. सध्याची परिस्थिती पाहता हा एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे. कृपया यात सामील व्हा. न्यायाधीशांच्या उत्तदायित्वाचा काळ आहे. दुर्देवाने अनेक न्यायाधीशांनी धोका दिला आहे. आणि संविधानासोबत फ्रॉड केला आहे. त्यांचं उत्तरदायित्त्व योग्य वेळी ठरवलं जाईल, असं सौरभ दासने म्हटलं आहे. या कार्यक्रमात सर्वोच्च न्यायालयाचे माजी जस्टिस ए. एस. ओका, कपिल सिब्बल आणि प्रशांत भूषण विचार मांडणार आहेत.

लेख वाचण्याचं आवाहन

न्यायिक नियुक्त्यांपासून माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या कार्यशैलीवर सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश संजय किशन कौल यांनी एक विधान केलं आहे. त्यानंतर सौरभ दासने माजी सरन्यायाधीशांबद्दलचा आपला लेख शेअर करून तो वाचण्याचे आवाहन केले आहे. माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या न्यायिक नियुक्तींशी संबंधित कार्यशैलीवर टीका करताना ते ‘सरकारप्रती गरजेपेक्षा जास्त नम्र’ होते, असा आरोप न्यायमूर्ती कौल यांनी केला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us