Farmer Protest : सलग 17 दिवस सायकल चालवत ओडिशातून गाझीपूर बॉर्डरवर, शेतकऱ्यांना पाठिंबा देणारा व्यक्ती कोण?

| Updated on: Feb 20, 2021 | 1:29 AM

मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अनेक लोक पुढे येत आहेत.

Farmer Protest : सलग 17 दिवस सायकल चालवत ओडिशातून गाझीपूर बॉर्डरवर, शेतकऱ्यांना पाठिंबा देणारा व्यक्ती कोण?
Follow us on

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अनेक लोक पुढे येत आहेत. देशभरातून कोट्यावधी लोक या आंदोलनाला आपला पाठिंबा देत आहेत. यापैकीच एक असलेली एक व्यक्ती शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी थेट ओडिशातून दिल्लीच्या गाझीपूर सीमेवर आलीय. ही व्यक्ती एक मूर्तीकार असून त्यांनी हा प्रवास तब्बल 17 दिवस सलग प्रवास करत पूर्ण केलाय. मुक्तिकांत बिस्वाल असं या मूर्तीकाराचं नाव आहे. ते मूर्ती तयार करुन शेतकऱ्यांना आपला पाठिंबा देत आहेत. 32 वर्षीय मुक्तिकांत बिस्वाल ओडिशाचे रहिवासी आहेत (Sculptor Muktikant Biswal come to Gazipur border by cycle in 17 days from Odisa).

मुक्तिकांत बिस्वाल आपल्या वडिलांसोबत गावाकडे मूर्ती तयार करुन विकतात. हाच त्यांच्या उपजीविकेचा एकमेव मार्ग आहे. जवळपास 3 महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर शेतकरी कृषी कायद्यांना विरोध करत आहेत. तसेच हे कायदे तात्काळ रद्द करावेत, अशी मागणी करत आहेत. या मागणीला पाठिंबा देत लाखो शेतकरी आपल्या कुटुंबांसह दिल्लीच्या सीमेवर जमा झालेत. या आंदोलनात महिलांचंही मोठं प्रमाण आहे.

मूर्तीकार मुक्तिकांत बिस्वाल यांनी शेतकरी आंदोलनात आल्यापासून 3 मूर्ती तयार केल्यात. यात एक उद्योगपतीची आणि दोन शेतकऱ्यांच्या मूर्ती आहेत. ते मूर्ती तयार करुन शेतकऱ्यांना पाठिंबा देत आहेत. आपल्या या तीन मूर्तींपासून ते एक देखावा करणार आहेत. यात उद्योगपती दोन शेतकऱ्यांच्या खांद्यावर औत घालून हाकताना दाखवण्यात येणार आहे. मुक्तिकांत यांनी शेतकऱ्याला बैलाच्या जागेवर दाखवत उद्योगपतींकडून शेतकऱ्यांचं शोषण होत असल्याचं दाखवलं आहे.

मूर्ती बनवून शेतकऱ्यांना अनोखा पाठिंबा

शेतकरी आंदोलनात सहभागी अनेक लोक आपल्याला शक्य आहे ते काम करत या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. त्याचाच भाग म्हणून मुक्तिकांत बिस्वाल यांनी देखील आपल्याकडील कलागुणांचा वापर करत नव्या कृषी कायद्यांमुळे होणारी शेतकऱ्यांची अवस्था यावर मूर्ती तयार केल्यात. बिस्वाल यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा देत करार पद्धतीच्या शेतीवर मूर्ती तयार केल्यात.” मुक्तिकांत बिस्वाल 29 जानेवारी रोजी शेतकरी आंदोलनात सहभागी झाले आहेत.

शेतकरी आणि सरकारमध्ये अनेक बैठका निष्फळ

सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये आतापर्यंत 11 फेऱ्यांमध्ये चर्चा झालीय. मात्र, अद्याप आंदोलनावर कोणताही तोडगा निघालेला नाही. दुसरीकडे चर्चेतून मार्ग काढण्यास शेतकरी संघटना आणि सरकार दोन्ही तयार आहेत. असं असलं तरी मागील अनेक दिवसांपासून शेतकरी आंदोलनावर कोणताही चर्चा पुढे सरकलेली नाही. शेतकरी आंदोलक कृषी कायदे रद्द करण्याच्या आपल्या मागणीवर ठाम आहेत.

हेही वाचा :

केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात देशभरात शेतकऱ्यांचा ‘रेल रोको’

अमिताभ बच्चन देशाचा आदर्श नाही, कॅनडाच्या अक्षय कुमारला भारतावर बोलण्याचा अधिकार काय? : राष्ट्रवादी

शेतकरी घरी असते तरी मेलेच असते ना…, शेतकरी आंदोलनावर हरियाणाच्या कृषीमंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य

व्हिडीओ पाहा :

Sculptor Muktikant Biswal come to Gazipur border by cycle in 17 days from Odisa