
सीमा हैदर प्रकरणात आता नवीन खुलासा समोर आला आहे. गुप्तचर यंत्रणांच्या सूत्रांनुसार, सीमा तिसऱ्या व्यक्तीच्या मदतीने भारतात पोहोचली आहे. यासाठी तिला प्रशिक्षण दिलं होतं.

तपास यंत्रणांच्या मते, भारत-नेपाळ सीमा ओलांडण्यासाठी मानवी तस्करी किंवा वेश्याव्यवसाय रॅकेटमध्ये सामील असलेल्या महिलांकडूनही अशीच पद्धत वापरली जाते.

नेपाळमध्ये उपस्थित असलेले पाकिस्तानी हस्तक महिलांना प्रशिक्षण देतात. तसेच अवैध कृत्ये करण्यासाठी भारतात पाठवले जाते.

भारत नेपाळ सीमेवर काही एजंट अशा लोकांना अनधिकृतपणे भारतात एन्ट्री देतात. आता याचीही चौकशी केली जात आहे.

एटीएसच्या चौकशीत सीमा हैदरने अनेक खुलासे केले आहेत. यात ती कशी पाकिस्तानमधून दुबई, दुबईतून नेपाळ आणि नेपाळमधून भारतात आली, याबाबत माहिती दिली आहे.

सीमा हैदरच्या जीवाला धोका असल्याने सचिन आणि सीमाच्या चार मुलांना पोलीस क्वार्टरमध्ये शिफ्ट केलं आहे. तिच्याकडून अजून धक्कादायक माहिती उघड होऊ शकते.