पीएम मोदींच्या हस्ते SEMICON India 2026 चे उद्धघाटन, सेमीकंडक्टर क्षेत्रात भारताची गरूड भरारी!

PM Narendra Modi inaugurated SEMICON India 2026 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते SEMICON India 2026 चे उद्धघाटन करण्यात आले. यामुळे भारताच्या सेमीकंडक्टर इकोसिस्टिमचा झपाट्याने विकास होणार आहे. ब्रिक्स परिषदेनंतर भारताने मोठे पाऊल टाकल्याचे दिसून येते.

पीएम मोदींच्या हस्ते SEMICON India 2026 चे उद्धघाटन, सेमीकंडक्टर क्षेत्रात भारताची गरूड भरारी!
नरेंद्र मोदी
Image Credit source: एजन्सी
| Updated on: Sep 17, 2026 | 3:35 PM

सेमीकॉन इंडिया 2026 च्या माध्यमातून भारताने मोठी झेप घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते SEMICON India 2026 चे उद्धघाटन झाले. भारताच्या सेमीकंडक्टर इकोसिस्टिमचा झपाट्याने विकास होण्यासाठी ही परिषद महत्त्वाची मानली जात आहे. नवी दिल्लीतील यशोभूमी येथे मोदींनी या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे भव्य उद्धघाटन केले. या परिषदेत “सिलिकॉन ते सिस्टिम्स: बिल्डिंग द इकोसिस्टिम” ही महत्त्वाची संकल्पना आहे. त्याआधारे सहकार्य, गुंतवणूक आणि तंत्रज्ञानावर भर दिल्या जाणार आहे.

12 चिप निर्मिती प्रकल्पांना ग्रीन सिग्नल

इंडिया सेमीकंडक्टर मिशनचा देशात दुसरा टप्पा सुरू आहे. त्यासाठी 8 अब्ज डॉलर्सवरून निधी थेट 13.5 अब्ज डॉलर्सवर पोहचला आहे. आतापर्यंत देशातंर्गत 12 चिप, सेमीकंडक्टर निर्मिती प्रकल्पांना मंजूरी मिळाली आहे. येत्या काही काळात ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. तर नुकतेच मोहाली आणि सुरत येथे दोन सेमीकंडक्टर प्रकल्पांमध्ये व्यावसायिक उत्पादनाला सुरुवातही झाली आहे. भारतातील निर्मित चिप आता परदेशातही निर्यात होत आहे. हे देशाचे मोठे पाऊल मानल्या जात आहे. तैवान, चीन, दक्षिण कोरिया, अमेरिका, जर्मनी यांच्यात पंक्तीत भारत बसला नाही तर लवकरच या क्षेत्रात दबदबा निर्माण करण्यात येणार आहे.

मंदीच्या काळातही विकासाची घोडदौड

या कार्यक्रमात बोलातना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेवर मोठे भाष्य केले. एका बाजूला भारतीय अर्थव्यवस्थेने जागतिक मंदीच्या काळातही 7.8 टक्के विकास दर गाठला आहे, असे मोदी म्हणाले. जपानच्या क्रेडिट रेटिंग एजन्सीने भारताचे सॉव्हरेन रेटिंग वाढवणे हे भारतीय अर्थव्यवस्थेच्या विश्वासाचा पुरावा असल्याचे मोदी म्हणाले. ब्रिक्स परिषदेत नवी दिल्ली जाहीरनामा सर्वसंमतीने स्वीकारण्यात आला. त्याचा उल्लेख करत हे भारताचा वाढत्या जागतिक प्रभावाचे प्रतिक असल्याचे मोदी म्हणाले.

देशातील 200 स्टार्टअप्ससाठी मोठी संधी

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि महातिी तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, गेल्या अनेक दशकांपासून सेमीकंडक्टरचा मुहूर्त साधायचा होता. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात हे स्वप्न साकार होत आहे. आता सेमिकॉन 2.0 च्या माध्यमातून सेमीकंडक्टर डिझाईन, मशिन्स, मटेरिअल, मेमरी, सिलिकॉन या क्षेत्रात भरीव कामगिरी करण्यात येईल. या परिषदेमुळे देशातील किमान 200 स्टार्टअप्सांना मोठी संधी आणि पाठबळ मिळेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

परिषदेत जागतिक दिग्गजांची हजेरी

या जागतिक प्रदर्शनात 600 हून अधिक प्रदर्शक, 300 हून अधिक आंतरराष्ट्रीय कंपन्या आणि 50 हून अधिक देशांचे प्रतिनिधींनी हजेरी लावली आहे. जपान, दक्षिण कोरिया, मलेशिया, नेदरलँड्स, सिंगापूर आणि स्वीडन देशातील तज्ज्ञ संमेलनात सहभागी झाले आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us