Delimitation Bill : अखेर शरद पवारांनी काँग्रेसला संदेश पाठवला, डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणार, कारणही सांगितलं

खासदार शरद पवार यांनी काँग्रेस हायकमांडला संदेश पाठवला आहे. पक्षाच्या खासदारांची भाजपशी चर्चा झाली असून ते विधेयकाच्या समर्थनात ते उभे राहणार आहेत, असे शरद पवार यांनी काँग्रेसला सांगितले आहे.

Delimitation Bill : अखेर शरद पवारांनी काँग्रेसला संदेश पाठवला, डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणार, कारणही सांगितलं
sharad pawar and rahul gandhi
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 27, 2026 | 9:35 PM

Delimitation Bill : महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाची संपूर्ण देशात जोरदार चर्चा सुरू आहे. हे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांत मंजूर व्हावे यासाठी सत्ताधारी भाजपाकडून प्रयत्न केले जात आहेत. विशेष म्हणजे इंडिया आघाडीतील काही घटकपक्षदेखील या विधेयकाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. यात शरद पवार यांचा पक्ष आघाडीवर असल्याचे बोलले जात होते. दरम्यान, पवारांचा पक्ष या विधेयकाला पाठिंबा देणार की नाही, याबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे. असे असतानाच आता मोठी आणि महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार यांनी काँग्रेसला संदेश पाठवला आहे. आम्ही या विधेयकाला पाठिंबा देणार आहोत, असा संदेश पवारांनी काँग्रेसला पाठवला आहे.

शरद पवारांनी पाठवलेल्या संदेशात काय आहे?

खासदार शरद पवार यांनी काँग्रेस हायकमांडला संदेश पाठवला आहे. पक्षाच्या खासदारांची भाजपशी चर्चा झाली असून ते विधेयकाच्या समर्थनात ते उभे राहणार आहेत, असे शरद पवार यांनी काँग्रेसला सांगितले आहे. पक्ष एकसंध ठेवण्यासाठी विधेयकाला समर्थन देण्याची वेळ आली आहे, असेही शरद पवार यांनी काँग्रेसला आपल्या संदेशात सांगितले आहे. तशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, या विधेयकावर भूमिका ठरवण्यासाठी इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीत शरद पवार यांचा पक्ष नेमकी काय भूमिका घेणार, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

Loading...

दुसरीकडे या विधेयकात नेमके काय असेल?

विधेयकातील तरतुदी समोर आल्या आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार मतदारसंघ पुनर्रचनेत सध्याच्या जागांपेक्षा जागा 50 टक्क्यांनी वाढण्याची तरतूद करण्यात आली आहे. या तरतुदीनुसार लोकसभेच्या जागा 850 पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे. महिलांना 33 टक्के आरक्षणाचाही यात प्रस्ताव आहे. लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना एकतृतीयांश म्हणजेच 33 टक्के आरक्षण लागू केले जाईल. एकदा मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यावर 2051 सालापर्यंत जागांच्या पुनर्रचनेला स्थगिती दिली जाईल, अशीही तरतूद यात आहे. या तरतुदीनुसार राज्यांसाठी लोकसभेच्या कमाल जागा 530 वरून 815 करण्याचा प्रस्तावही यात आहे. केंद्रशासित प्रदेशांसाठी कमाल जागा 20 वरून 35 करण्याचा प्रस्ताव या विधेयकात तरण्यात आला आहे. या विधेयकामुळे विधानसभांच्या जागाही वाढणार आहेत. राज्य विधानसभांची कमाल सदस्यसंख्या 500 वरून 650 करण्याचा प्रस्ताव या विधेयकात आहे. त्यामुळे आता हे विधेयक मंजूर होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. लोकसभा आणि विधानसभांच्या जागांची नव्याने रचना होणार

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us