AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shivsena Supreme Court Hearing : आज सुप्रीम सुनावणीत एकनाथ शिंदेंची बाजू मांडणारे कपिल सिब्बलांच्या तोडीस तोड असलेले ते तीन वकिल कोण?

Shivsena Supreme Court Hearing : सर्वोच्च न्यायालयात आज शिवसेना कोणाची? या खटल्याची सुनावणी होणार आहे. उद्धव ठाकरे गटाचा युक्तीवाद संपला असून आता एकनाथ शिंदे गट बाजू मांडणार आहेत. शिवसेना कोणाची? या प्रश्नाचं सगळ्यांना उत्तर हवं आहे.

Shivsena Supreme Court Hearing : आज सुप्रीम सुनावणीत एकनाथ शिंदेंची बाजू मांडणारे कपिल सिब्बलांच्या तोडीस तोड असलेले ते तीन वकिल कोण?
Shivsena Case Supreme Court Hearing
| Updated on: Sep 02, 2026 | 6:48 AM
Share

सगळ्या महाराष्ट्राच लक्ष लागलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्ह खटल्याची आज पुन्हा सुनावणी सुरु होणार आहे. दोन आठवड्यांपूर्वी उद्धव ठाकरे गटाचा युक्तीवाद संपला होता. खरी शिवसेना कोणाची? एकनाथ शिंदेंची की, उद्धव ठाकरेंची? या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांना हवं आहे. दोन्ही नेत्यांच्या राजकीय भविष्याच्या दृष्टीने सुद्धा या खटल्याचा निकाल तितकाच महत्वाचा असणार आहे. ठाकरे गटाकडून वकिल कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी युक्तीवाद केला. त्यांनी केलेल्या युक्तीवादाची सर्वसामान्यांमध्ये चर्चा आहे.

निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष यांच्या निर्णयाभोवती ठाकरेंच्या वकिलांचा युक्तीवाद केंद्रीत होता. निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेंकडे सोपवताना कसे एकतर्फी निर्णय घेतले यावर बाजू मांडली. आजपासून सुरु होणाऱ्या युक्तीवादात एकनाथ शिंदेंचे वकिल त्यांना उत्तर देतील.

शिंदेंच्या वकिलांची बाजू देखील तितकीच तगडी

कपिल सिब्बल हे जितकं मोठं नाव आहे, तसच एकनाथ शिंदेंचे वकिल सुद्धा तितकेच मोठे आहेत. मुकुल रोहतगी, नीरज किशन कौल आणि मनिंदर सिंग हे शिंदे शिवसेनेची बाजू मांडतील. मुकुल रोहतगी खूप मोठं नाव आहे. ते भारताचे अटॉर्नी जनरल होते. त्याचवेळी इतर दोन वकिल माजी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल पदावर होते. त्यामुळे शिंदेंच्या वकिलांची बाजू देखील तितकीच तगडी आहे.

कोण आहेत मुकुल रोहतगी ?

मुकुल रोहतगी यांनी वर्ष 2002 मध्ये गुजरात दंगलीच्या खटल्यात राज्य सरकारची बाजू सुप्रीम कोर्टात मांडली होती. बनावट चकमकीच्या आरोपांमध्ये राज्य सरकारची बाजू मांडलेली. त्या शिवाय बेस्ट बेकरी आणि जाहिरा शेख प्रकरणात सुप्रीम कोर्टात युक्तीवाद केला आहे.

मुकुल रोहतगी यांनी मुंबईच्या गवर्नमेंट लॉ कॉलेजमधून कायद्याची डिग्री घेतली आहे. त्यानंतर त्यांनी योगेश कुमार सभरवाल यांचे ज्यूनियर म्हणून प्रॅक्टिस सुरु केली. योगेश कुमार सभरवाल देशाचे 36 वे चीफ जस्टिस बनले. मुकुल रोहतगी यांनी जस्टिस योगेश कुमार सभरवाल यांच्यासोबत हाय कोर्टात काम सुरु केलं. वर्ष 1993 मध्ये दिल्ली हाय कोर्टाने त्याने सीनियर वकिलाचा दर्जा दिला. 1999 साली मुकुल रोहतगी एडिशनल सॉलिसिटर जनरल बनले. त्यावेळी केंद्रात अटल बिहारी वाजपेयींचं सरकार होतं.

मुकुल रोहतगी यांना 19 जून 2014 रोजी तत्‍कालीन राष्‍ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी अटॉर्नी जनरल म्हणून नियूक्‍त केलं होतं. ते 18 जून 2017 पर्यंत देशाचे 14 वे अटॉर्नी जनरल राहिले. मुकुल रोहतगी सुप्रीम कोर्टाचे वरिष्‍ठ आणि दिग्‍गज वकिल आहेत. रोहतगींचे वडिल अवध बिहारी रोहतगी दिल्‍ली हाय कोर्टात जज होते.

नीरज किशन कौल कोण?

नीरज किशन कौल भारताचे प्रसिद्ध वरिष्ठ वकिल आहेत. ते माजी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल पदावर होते. ते भारताच्या सर्वोच्च न्यायालय आणि विभिन्न उच्च न्यायालया संवैधानिक, वाणिज्यिक आणि कॉर्पोरेट खटल्यांमध्ये युक्तीवाद करतात.

मनिंदर सिंग

मनिंदर सिंग सुद्धा सुप्रसिद्ध वकिल आहेत. त्यांनी सुद्धा माजी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल पद भूषवलं आहे. गुन्हे आणि कॉर्पोरेट कायद्याचा त्यांना दीर्घ अनुभव आहे.

Follow Us
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेचा तपास...
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेच्या तपासाला वेगळेच वळण
टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळ्या झाडल्या, बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर
टायगर श्रॉफच्या गाडीवर धाडधाड गोळ्या झाडल्या, पण कारण काय? बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर!
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? भारताच्या सर्वोच्च न्यायालयात...
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? सर्वोच्च न्यायालयात... नेमका निर्णय काय?
भिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून..
Tiger shroff Video : अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा पहिला थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून आलेले तिघं...
अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
Latest Update : अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा,
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा, इतर योजनांमधील निधी...
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार,
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार, म्हणाले एक्सपायरी डेट जवळ आली
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना...
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना उधाण
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड सहभागी,