
राजस्थानच्या जैसलमेरमध्ये बसला आग लगल्याने नुकताच २० लोकांची मृत्यू झाला. तसेच आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी एका स्लीपर बसला झालेल्या अपघातात २० प्रवाशांचा मृत्यू झाला होता. एका दुचाकीला धडक दिल्यानंतर बसने पेट घेतला आणि ही भीषण दुर्घटना घडली.राजस्थानच्या जैसलमेरच्या प्रकरणात तपासात या बसेसमध्ये फटाके ठेवण्यात आल्याचेही उघडकीस आले आहे. खाजगी ट्रॅव्हलच्या बसेसमध्ये मोठ्या प्रमाणावर सामानाची बेकायदेशीर वाहतूक केली जात असते. यात अनेक सुरक्षाविषयक नियमांचे सर्रास उल्लंघन केले जाते. पर राज्यातून येणाऱ्या खाजगी बसेस तर अनेक नियम पायदळी तुडवत असतात असे उघडकीस आले आहे. राजस्थानचे जैसलमेर असो की आंध्रातील कुर्नूल असो दोन्ही ठिकाणी प्रत्येकी २० प्रवाशांची हकनाक बळी गेल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या भयानक घटनेत प्रवाशांना वाचवण्याची कोणतीही संधी मिळाली नाही.जैसलमेर घटनेची चौकशी झाली असता बसेसमध्ये फटाके देखील ठेवले होते असे उघडकीस आले आहे. त्यामुळे आगीने विक्राळ रुप धारण...