AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dead body in suitcase: कुणी प्रियकर, कुणी प्रेयसी, कुणी सख्ख्या मुलांचे मृतदेह भरले सूटकेसमध्ये, ह्रद्याचा थरकाप उडवणाऱ्या घटना

32 वर्षांच्या प्रीतीच्या सूटकेसमध्ये गेल्या चार वर्षांपासून ज्या बॉयफ्रेंडसोबत राहत होती, त्याचा मृतदेह होता. त्या मृतदेहाच्या अंगावर अंडरवेअर व्यतिरिक्त एकही कपडा नव्हता. गळा दाबून त्याचा खून करण्यात आला होता. ही एक घटना नाही, अशा बऱ्याच घटना गेल्या काही काळत उघडकीस आल्या आहेत. त्यात सूटकेसमध्ये मृतदेह किंवा त्या मृतदेहाचे तुकडे टाकून त्यांची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न झालेला आहे. जाणून घेऊयात अशा काही घटना

Dead body in suitcase: कुणी प्रियकर, कुणी प्रेयसी, कुणी सख्ख्या मुलांचे मृतदेह भरले सूटकेसमध्ये, ह्रद्याचा थरकाप उडवणाऱ्या घटना
मृतदेहांची सूटकेसImage Credit source: social media
| Edited By: | Updated on: Aug 11, 2022 | 10:01 PM
Share

नवी दिल्ली – घटना गाझियाबादची (Ghaziabad)आहे. रात्री उशिरा एक तरुणी (Young lady)मोठी सुटकेस (Suitcase)घेऊन रस्त्यावरुन चालत होती. ना तिला रिक्षा मिळत होती, ना कोणती गाडी रस्त्यावर होती, जी तिला लिफ्ट देऊ शकेल. तेवढ्यात एक पेट्रोलिंग करणारी पोलिसांची गाडी तिच्या बाजूने जात असताना तिथे थांबली. पोलिसांनी तिला मदतीचे आवाहन केले. मात्र तरुणीने त्यांची मदत नाकारली. पोलिसांनी पाहून तिला घाम फुटला होता. पोलिसांची गाडी समोर निघून गेली. त्या तरुणीने सुटकेचा निश्वास टाकला. पण खरा खेळ आता सुरु झाला होता. पोलीस पुढे तिची वाट पाहत उभे होते. तरुणी थोडी पुढे गेली नसेल तोच पोलिसांनी तिला रोखले आणि तिला ती सुटकेस उघडण्यास सांगितले. ती बॅग उघडल्यानंतर पोलीसही हैराण झाले. त्या सुटकेसमध्ये त्या तरुणीच्या बॉयफ्रेंडचा मृतदेह कापलेल्या अवस्थेत होता. सोमवारी रात्री ही घटना घडली आहे. 32 वर्षांच्या प्रीतीच्या सूटकेसमध्ये गेल्या चार वर्षांपासून ज्या बॉयफ्रेंडसोबत राहत होती, त्याचा मृतदेह होता. त्या मृतदेहाच्या अंगावर अंडरवेअर व्यतिरिक्त एकही कपडा नव्हता. गळा दाबून त्याचा खून करण्यात आला होता. ही एक घटना नाही, अशा बऱ्याच घटना गेल्या काही काळत उघडकीस आल्या आहेत. त्यात सूटकेसमध्ये मृतदेह किंवा त्या मृतदेहाचे तुकडे टाकून त्यांची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न झालेला आहे. जाणून घेऊयात अशा काही घटना

उत्तराखंडमध्ये प्रियकराने प्रेयसीला मारुन मृतदेह सूटकेसमध्ये भरला

ही घटना 24 मार्च 2022 आहे. उत्तराखंड पोलिसांनी एका तरुणाला सूटकेससह अटक केली. या तरुणाने त्याच्या प्रेयसीचा खून करुन तिचा मृतदेह सूटकेसमध्ये भरला होता. हा मृतदेह तलावात टाकण्यासाठी तो निघालेला असताना पोलिसांनी त्याला गाठले. या आरोपीचे नाव गुलजेब असे होते. मृत तरुणीला घेून तो साबरी हॉटेलमध्ये आला होता. गुलजेबला या मुलीशी निकाह करायचा होता. मुलीचे घरचे या लग्नासाठी तयार नव्हते. घरच्यांच्या मर्जीविरुद्ध निकाह करण्यास या तरुणीने नकार दिला. त्यामुळे राग आल्याने गुलजेबने या तरुणीची हत्या केली होती.

गुजरातमध्ये नवजात बालक सूटकेसमध्ये

12ऑक्टोबर 2021 ची घटना आहे. गुजरातच्या गाँधीनगर परिसरात स्वामी नारायण गोशाळेच्या बाहेर दहा महिन्यांच्या मुलाला सूटकेसमध्ये ठेवले होते. त्याच्या वडिलांनीच त्याला या सूटकेसमध्ये ठेवले होते. आरोपी होता उ. प्रदेशातील रहिवासी सचिन दीक्षित. तो गांधीनगरच्या एका कंपनीत असिस्टंट मॅनेजर पदावर कार्यरत होता. चार वर्षांपूर्वी घरच्यांच्या सांगण्यावरुन त्याने अनुराधा नावाच्या तरुणीशी विवाह केला होता. त्यांना तीन वर्षांचा मुलगाही होता. 2018 साली एका शोरुममध्ये त्याच ओळख हीना नावाच्या मुलीशी झाली. त्यानंतर तो तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहू लागला. तिच्यापासून झालेला मुलागच त्याने सूटकेसमध्ये ठेवला होता. त्याने हीनाची हत्या केली होती. तिचा मृतदेह एका सूटकेसमध्ये बंद करुन त्याने गुजरातमधील त्याच्या घरात तो ठेवला होता.

हुंड्यासाठी मुलीला मारले मृतदेह सूटकेसमध्ये

23 जुलै 2020 ची ही घटना आहे. रात्री अचानक तरुणी तिच्या सासरच्या घरातून बेपत्ता झाली. याबाबत माहेरच्यांनी बुलंदशहर पोलिसांत तक्रार केली. दोन दिवसांनी गाइियाबाद पोलिसांना एक सूटकेस मिळाली. त्या सूटकेसमध्ये एका महिलेचा मृतदेह होता. बुलंदशहर पोलीस गाझियाबादमध्ये आले. या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली. वरीशा असे या तरुणीचे नाव होते. हुड्यासाठी तिचा पती, सासू, सासऱ्यांनी तिची हत्या केली होती. तिघांनाही अटक करण्यात आली.

जलालाबादच्या नदीत सूटकेसमध्ये सापडला मृतदेह

17  एप्रिल 2020 ची ही घटना आहे. उ. प्रदेशातील जलालाबादमध्ये अशीच एक घटना घडली होती. बहगुल नदीत एका सूटकेसमध्ये मृतदेह सापडला होता. स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिली होती. मृतदेह सूटकेसमध्ये टाकून, सूटकेस नदीत फेकण्यात आली होती. मृतदेह पाण्याने सडून मोठा झाल्यानंतर तो सूटकेसच्या बाहेर आला होता. या मृत महिलेच्या छातीवर आणि चेहऱ्यावर वार करण्याच आले होते.

लखनौत तरुणीचा निर्घृण खून

22 जानेवारी 2019 ची घटना. एका तरुणीचा मृतदेह सूटकेसमध्ये मिळाला होता. पोलिसांनी व्हिडिओ शूटिंग करत ही सूटकेस उघडली होती. या तरुणीच्या शरिरावर सिगारेटने चटके देण्यात आले होते. त्यानंतर तिचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता. ओळख पटू नये यासाठी चेहरा आणि पोटाचा काही भाग जाळण्यात आला होता. ट्रॉली बॅगमध्ये हा मृतदेह कोंबण्यात आला होता. उ. प्रदेशातील लखनौजवळ गोसाईगंज पोलीस ठाणे परिसरात हा प्रकार घडला होता.

कल्याणात वडिलांनीच केली होती हत्या

2019 सालातील ही घटना आहे. ठाण्याजवळ कल्याणमध्ये शिर नसलेला मुलीचा मृतदेह सापडला होता. या मुलीच्या वडिलांनीच तिची हत्या केली होती. हत्येनंतर सूटकेस रिक्षात ठेवून वडील फरार झाले होते. ऑनर किलिंगच्या प्रकरणातून ही हत्या करण्यात आली होती. मुलीला आवडलेला मुलगा पसंत न आल्याने पित्याने ही हत्या केली होती.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.