शरद पवार यांनी परदेशी असल्याचा मुद्दा मांडल्याने दु:ख झाले, सोनिया गांधींची पुस्तकातून कबुली…

काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया यांनी एकूण सात भाग असलेल्या या ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव’ पुस्तकात अनेक राजकीय प्रकरणावर पहिल्यांदाच भाष्य केले आहे. या पुस्तकात त्यांच्या जीवनातील खाजगी आणि वेदनादायक काळाचाही उल्लेख त्यांनी केला आहे. त्यांनी मे १९९१ मध्ये त्यांचे पती आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येनंतरचे दिवसांचाही उल्लेख केला आहे.

शरद पवार यांनी परदेशी असल्याचा मुद्दा मांडल्याने दु:ख झाले, सोनिया गांधींची पुस्तकातून कबुली...
SHARAD PAWAR AND SONIA GANDHI
| Updated on: Nov 10, 2026 | 10:44 PM

काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांचे वादळी पुस्तक ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव’ मंगळवारी प्रकाशित झाले आहे. या पुस्तकात काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आपल्या परदेशी असल्याचा मुद्दा आणि पंतप्रधान पद नाकारल्याच्या मुद्याचाही ऊहापोह केला आहे. इंदिरा गांधी यांच्या पश्चात राजीव गांधी यांनी पंतप्रधान पदाला होकार दिल्याने आपण चिडले होतो असेही सोनिया गांधी यांनी पुस्तकात म्हटले आहे. तसेच केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी परदेशी असल्याचा मुद्दा मांडल्याने आपल्याला दु:ख झाले होते, पवार यांच्या वक्तव्यानंतर आपण थेट बैठकीतून बाहेर पडलो असेही सोनियांनी आपल्या आत्मकथनात्मक पुस्तकात म्हटले आहे.

ब्रेस्ट कॅन्सरनंतरचे जीवन –

साल २०१०मध्ये जेव्हा डॉक्टरांनी ब्रेस्ट कॅन्सरची शंका असल्याने तातडीने शस्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. तेव्हा आपण आतून हादरून गेलो होतो. मनात वाईट विचार आणि संभाव्य भयानक परिणांमाची भीती येऊ लागली होती. दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयातील डॉक्टरांवर पूर्ण विश्वास होता. पण भारतात राहिल्यास प्रसार माध्यमात आजारपणाची प्रचंड चर्चा झाली असती. त्यामुळे इटलीच्या मिलान येथील युरोपियन इन्सिट्युट ऑफ ऑन्कोलॉजीत आपण शस्रक्रिया करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी या पुस्तकात लिहीले आहे.

Loading...

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us