
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना आज संध्याकाळी उशिरा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार सोनिया गांधी यांना रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना शुक्रवारी सकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे.
सोनिया गांधी या 78 वर्षाच्या आहेत. त्यांची तब्येत बिघडल्याने संध्याकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र, सोनिया गांधी यांना नेमकं किती वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आलं हे समजू शकलं नाही. दुसऱ्या एका सूत्रानुसार सोनिया गांधी यांना गुरुवारी सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्या डॉक्टरांच्या एका टीमच्या निगराणी ठेवण्यात आलं आहे.
एका माहितीनुसार, सोनिया गांधी यांना सकाळी 8.30 वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना पोटासंबंधीच्या कारणामुळे त्यांना दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांची नियमित तपासणी करण्यात आली. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, सोनिया गांधी यांच्या प्रकृतीबाबत काँग्रेसकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
सोनिया गांधी या 13 फेब्रुवारी रोजी संसदेच्या बजेट सेशनला उपस्थित होत्या. त्या राज्यसभेच्या कामकाजात सहभागी झाल्या होत्या. 10 फेब्रुवारी रोजी त्यांनी लवकरात लवकर जनगणना करण्याची मागणी केली होती. तसेच देशातील 14 कोटी लोक खाद्यान्न सुरक्षा कायद्याच्या लाभापासून वंचित असल्याचा दावाही त्यांनी केला होता.
राज्यसभेत पहिल्या शून्यकाळात सोनिया गांधी यांनी खाद्यान्न सुरक्षा अधिनियमा अंतर्गत लाभार्थींची ओळख 2011च्या जनगणनेनुसार करण्याची मागणी केली होती. नवीन लोकसंख्येच्या आधारे ही ओळख होऊ नये, असं त्यांनी म्हटलं होतं. तसेच सोनिया गांधी यांनी राष्ट्रपतींच्या भाषणावरही टीका केली होती. त्यावरून वाद निर्माण झाला होता. भाजपने सोनिया गांधी यांच्या विधानाचा निषेध नोंदवला होता. तर काँग्रेसनेही भाजपला जशास तसे प्रत्युत्तर दिलं होतं.