आमदाराच्या लेकीच्या लग्नात वर्दीत पत्रावळ्या वाढणाऱ्यावर मोठी कारवाई, एसपीकडून अॅक्शन, जिल्ह्याच्या..
आमदार अनंत सिंह यांच्या मुलीच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगताना दिसली. अत्यंत शाही थाटात हे लग्न पार पडले. त्यातच आता मोठी टीका व्हायरल व्हिडीओनंतर केली जात आहे. त्यानंतर एसपींनी मोठी कारवाई केली.

बिहारच्या मोकामाचे आमदार अनंत सिंह यांची मुलगी शिवांगी सिंह हिच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगताना दिसली. कोट्यावधी रूपये या लग्नात खर्च करण्यात आला. 10 लाखाचे रस्सगुल्ले वऱ्हाडी मंडळाला खाऊ घालण्यात आली. 150 पेक्षा अधिक खाद्यपदार्थ आणि 4 लाख वऱ्हाडी मंडळ या लग्नात आले होते. यासोबतच काही स्पर्धा देखील या लग्नात ठेवण्यात आल्या. त्यात थार गाड्या गिफ्ट म्हणून दिल्या. वऱ्हाडी मंडळीला ने-आण करण्यासाठी चक्क हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली. आमदारांच्या लेकीच्या लग्नातील थाट पाहून सर्वचजण थक्क झाले. बिहारचा पारंपारिक लिट्टी-चोखासह अनेक खाद्यपदार्थ या लग्नात होती. लग्नात लाखो लोकांच्या पंगती बसल्या. बड्या नेत्यांनी या लग्नाला हजेरी लावली. फक्त बिहारच नाही तर या लग्नाची देशभरात जोरदार चर्चा रंगताना दिसली. तूफान क्रेझ होती. जावयावर पैशांचा पाऊस पाडला.
अनंत सिंह यांच्या मुलीच्या लग्नात काही अधिकाऱ्यांना कामाला लावण्यात आल्याचा आरोप आहे. त्यातच आता थेट लग्नात पत्रावळ्या वाटणाऱ्यावर जोरदार कारवाई करण्यात आली. वर्दीतील एक व्यक्ती या लग्नात पत्रावळ्या वाटताना दिसल्या. ज्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. आमदाराच्या लेकीच्या लग्नात चक्क वर्दीतील लोक पत्रावळ्या वाटताना दिसल्याने एकच धक्का बसला.
होमगार्ड सतीश कुमार हा अनंत सिंह यांच्या मुलीच्या लग्नात पंगतीमध्ये पत्रावळ्या वाटताना दिसला. त्यानंतर त्याच्यावर मोठी कारवाई करण्यात आली. एसपींनी होमगार्डवर कारवाई करत त्याची बदली तात्काळ केली. ड्युटी न करता तो लग्नात पत्रावळ्या वाटत होता. त्याला नोटीस पाठवण्यात आली. लदमा गावात अनंत सिंह यांच्या मुलीचा विवाहसोहळा पार पडला.
या लग्नामुळे वाहतूकीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, याकरिता पोलिसांचा आणि होमगार्डच्या ड्युटी मोठ्या प्रमाणात लावण्यात आल्या होत्या. मात्र, आपली ड्युटी सोडून चक्क हा होमगार्ड लग्नातील पंगतीमध्ये पतरवाळ्या वाटत होता. हा व्हिडीओ कोणीतरी तयार करून सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर या होमगार्डवर कारवाई करण्यात आली. अनंत सिंह यांच्या मुलीचे लग्न अत्यंत धुमधडाक्यात झाले.