Explained : बालकोट एअर स्ट्राइकच्यावेळी भारताने वापरलेला बॉम्ब किती डेंजर होता? त्यात काय टेक्नोलॉजी होती?

Explained : बालकोट एअर स्ट्राइकच्यावेळी भारताने स्पाइस 2000 हा एक खास बॉम्ब वापरलेला. या अस्त्राच वैशिष्ट्य काय होतं? टार्गेटपासून हे अस्त्र भरकटण्याची शक्यता कमीच होती. हा बॉम्ब काय होता? किती घातक होता? ते समजून घ्या. यावेळी भारत कुठलं टार्गेट निवडणार? कुठून, कसा हल्ला करणार? याची पाकिस्तानला चिंता लागून राहिली आहे.

Explained : बालकोट एअर स्ट्राइकच्यावेळी भारताने वापरलेला बॉम्ब किती डेंजर होता? त्यात काय टेक्नोलॉजी होती?
spice 2000
Image Credit source: wikipedia
| Updated on: Apr 28, 2025 | 4:17 PM

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताची पुढची Action काय असेल? याआधी भारताने पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राइक, एअर स्ट्राइक केलाय. त्यामुळे यावेळी भारत कुठलं टार्गेट निवडणार? कुठून, कसा हल्ला करणार? याची पाकिस्तानला चिंता लागून राहिली आहे. महत्त्वाच म्हणजे यावेळी भारत हल्ला करताना कुठली टेक्नोलॉजी दाखवणार? ते सुद्धा महत्त्वाच आहे. याआधी पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारताने बालाकोट येथे जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी प्रशिक्षण तळावर एअर स्ट्राइक केलेला. इंडियन एअर फोर्सची फायटर विमान 1971 च्या युद्धानंतर प्रथमच पाकिस्तानात घुसली होती. त्यांनी खैबर-पख्तूनख्वा प्रांतातील जैशचा तळ उडवून दिला होता. या एअर स्ट्राइकच्यावेळी इंडियन एअर फोर्सने स्पाइस-2000 (SPICE-2000) हा बॉम्ब वापरला होता. स्पाइस-2000 हा एक स्मार्ट बॉम्ब आहे.

इंडियन एअर फोर्सने हल्ल्यासाठी SPICE-2000 बॉम्बची निवड करण्यामागे एक खास कारण होतं, ते म्हणजे अचूकता. जे आपलं टार्गेट आहे, बरोबर त्याच ठिकाणी हल्ला करणं या बॉम्बमुळे शक्य झालं होतं. SPICE-2000 हा (Flying) म्हणजे उडता मार्गदर्शक किट आहे. इस्रायली संरक्षण कंपनी राफेलने या किटची निर्मिती केलेली. बालकोट एअर स्ट्राइकच्यावेळी आपण स्पाइस किट वापरलं. पण त्यातला बॉम्ब हा भारतीय बनावटीचाच होताच. नेमकं SPICE-2000 बॉम्ब काय आहे? तो कशा पद्धतीने काम करतो? ते समजून घ्या.

उड्डाण करणारा बॉम्ब

स्पाइस गायडन्स किटमध्ये दोन भाग आहेत. एक बॉम्बच्या पुढे जोडतात आणि दुसरा शेपटाकडे जोडला जातो. स्पाइस 2000 बॉम्बच्या पुढच्या भागात कॅमेरा असतो. शेपटाकडच्या भागाला पंख असतात, ज्यामुळे हा बॉम्ब स्वत: उड्डाण करु शकतो. कुठे हल्ला करायचा आहे हे ठरल्यानंतर या बॉम्बच्या मेमरी चीपमध्ये सर्व डाटा भरला जातो. या डाटामध्ये टार्गेट जवळचे जीपीएस सिग्नल्स असतात. टार्गेटचे उपग्रहाद्वारे काढलेले फोटो असतात. टार्गेटच्या आसपास काय भूभाग आहे ती माहिती असते. हा सर्व डाटा त्या बॉम्बमध्ये फीड केलेला असतो.

ठरलेल्या उंचीवर पोहोचली की, ते स्मार्ट बॉम्ब ड्रॉप करतात

स्पाइस 2000 चे दोन भाग त्या बॉम्बला जोडले जातात. स्पाइस किटमध्ये मेमरी चीप बसवली जाते. जेणेकरुन बॉम्बला आपले टार्गेट शोधून काढण्यात कुठली अडचण येऊ नये. त्यानंतर स्पाइस 2000 स्मार्ट बॉम्बसह फायटर जेटने आकाशात उड्डाण केलं. एकदा का फायटर विमानं ठरलेल्या ठिकाणी, ठरलेल्या उंचीवर पोहोचली की, ते स्मार्ट बॉम्ब ड्रॉप करतात. त्यानंतर या बॉम्बचा काम सुरु होतं. SPICE-2000 मधील ऑनबोर्ड कॉम्प्युटर मेमरी चीपमधील डाटाच्याआधारे बॉम्बला टार्गेटपर्यंत घेऊन जातो. स्पाइस किटमुळे हा बॉम्ब या सर्व प्रोसेस दरम्यान उड्डाणवस्थेत असतो. एका ठराविक काही किलोमीटर अंतरावरुन फायटर जेटमधून हा बॉम्ब लॉन्च केला जातो, म्हणजे ड्रॉप केला जातो.

कसा होतो अचूक हल्ला?

वरती तुम्हाला सांगितलय की या बॉम्बच्या आत एक कॅमेरा असतो. हा बॉम्बच्या तोंडाच्या बाजूला असलेला कॅमेरा फोटो काढतो. काढलेले फोटो आणि मेमरी चीपमध्ये असलेल्या डाटाबरोबर पडताळणी होते. म्हणून स्पाइस बॉम्बद्वारे केलेले हल्ला अचूक ठरतो.