success story : बी. टेक तरूणाने इंजिनीअरींग सोडून काढले समोशाचे दुकान, बनवले तोंडाला पाणी सुटणारे समोशाचे भन्नाट प्रकार

हिवाळ्यात गरमागरम समोसे खायायला मिळत असतील तर मजाच येईल. सध्या एका इंजिनिअर समोशाची खूपच चर्चा सुरू आहे. या समोशाचे नावच इंजिनिअर समोसा आहे. तर कुठे मिळतो हा इंजिनिअर समोसा पाहुयात.

success story : बी. टेक तरूणाने इंजिनीअरींग सोडून काढले समोशाचे दुकान, बनवले तोंडाला पाणी सुटणारे समोशाचे भन्नाट प्रकार
SAMOSA
Image Credit source: socialmedia
| Updated on: Jan 30, 2023 | 12:07 PM

कानपुर : इच्छा असेल तर मार्ग आपोआप तयार होतो. एका इंजिनिअर झालेल्या तरूणाला नोकरी ( JOB )  मिळाली नाही तर निराश न होता. त्याने उत्तर प्रदेशातील ( UP )  कानपूर शहरात समोसा  ( SAMOSA ) तयार करण्याचा अनोखा स्टार्टअप सुरू केला असून तेथील समोसे प्रचंड प्रसिद्ध झाले आहेत. कानपूरला  ( KANPUR ) रहाणाऱ्या अभिषेक कुमार याने राजस्थान येथील टेक्निकल यूनिवर्सिटी मधून बी. टेक केले आहे. कोरोनाकाळात जेव्हा सर्व व्यवहार ठप्प झाले तेव्हा त्याने काही मोठं करायला हवं असे मनाशी पक्के करीत नोकरीच्या मागे न लागता समोशाचे नवनवीन प्रकार शोधून काढले, पाहूया काय आहे त्याची सक्सेस स्टोरी

कानपूर शहर वेगवेगळ्या स्वादीष्ठ पदार्थांसाठी ओळखले जाते. परंतू सध्या कानपूरमध्ये अनोख्या समोशाची चर्चा सुरु आहे. त्याचे कारण म्हणजे समोसा आता इंजिनिअरींगच्या डीग्रीत मिळत आहे. या समोसा दुकानातील विविध समोशांची नाव ऐकून लोक आश्चर्यचकीत होत आहेत. समोसा या पदार्थाने इंजिनिअरींग कशी केली याचे तुम्हाला आश्चर्य वाटत असेल परंतू कानपूरला इंजिनिरींगच्या विविध प्रकारचे समोसे मिळत आहेत. तर पाहूयात समोशाने कशी इंजिनिअरींग केली ते..

अभिषेक यांनी 2020 मध्ये त्याचे बी.टेक पूर्ण केले. जेव्हा जॉबमध्ये मन लागेना तेव्हा त्याने कोरानाकाळात नवा स्टार्टअप करण्याचे ठरविले. त्याने त्यासाठी खूपच रिसर्च केला. त्यानंतर त्याने फूडलाइनमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्याच्या मनात आले की असा आयटम जो सर्व ठिकाणी मिळतो आणि विकला जातो. त्यानंतर त्याच्या नजरेसमोर समोसाच आला. समोसा गल्लीपासून मॉलपर्यंत सर्व ठीकाणी मिळतो. या समोसाचे त्याने इंजीनियरिंग समोसा बनवून टाकले.

प्रत्येक शाखेचे समोसे मिळतात


2021 मध्ये कानपूरच्या काकदेव परीसरात त्याने दुकान उघडले. आणि समोसाचे विविध प्रकार शोधले. जेवढ्या अभियांत्रिकी शाखा आहेत. त्याप्रमाणे प्रत्येक अभियांत्रिकी शाखेचे वेगवेगळे समोसे येथे उपलब्ध आहेत. हे सर्व समोसे अभिषेक स्वत: बनवतात, त्यांच्या स्टाफिंगपासून ते तळण्यापर्यंत सर्व काही अभिषेक स्वत: करतात. समोशाच्या इथे चॉकलेट समोसा, मोमोज समोसा, पनीर समोसा, पास्ता समोसा, मंचुरियन समोसा आणि इतर अनेक प्रकार मिळतात.

या दुकानातील समोशांची किंमत अगदी 10 रुपयांपासून 60 रूपयांपर्यंत आहे. हा समोसा गोड चटणी आणि हिरव्या चटणीसोबत दिला जातो. वास्तविक हे दुकान कोचिंग मार्केटजवळ असल्याने येथे विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असते. जर कोणी इतर जिल्ह्यातून कानपूरला पोहोचले तर कानपूर रेल्वे स्थानकावरून रावतपूर आणि रावतपूरहून काकादेवला पोहोचू शकते.

समोशाबरोबर आइस्क्रीमचे फ्यूजन

तुम्ही आईस्क्रीम सोबत समोसे कधीच खाल्ले नसतील, परंतू येथे तुम्हाला इंजिनीअरिंग समोसा दुकानात समोसे आइस्क्रीमसोबत दिले जातात. जे एकदमच वेगळे आणि खास आहेत. अभियंता अभिषेक कुमार यांचा इंजिनियर समोसा स्टार्टअप खूपच जोरदार सुरू आहे.