
मुंबई | खगोलप्रेमींसाठी अवघ्या काही मिनिटांमध्ये आकाशात अद्भूत आणि अफलातून असं दृष्य पाहायला मिळणार आहे. आकाशात काही मिनिटांनंतर सूपरमून दिसणार आहे. हा सूपरमून पाहण्यासाठी खगोलप्रेमींसह सर्वसामांन्यामध्ये उत्सुकतेचं वातावरण आहे.
सूपरमून दिसण्याची संधी वारंवार मिळत नाही. हा दुर्मिळ असा योग असतो. मात्र ऑगस्ट महिन्यात 1 तारखेनंतर 30 ऑगस्टला पुन्हा सूपरमून पाहता येणार आहे. ऑगस्ट महिन्यात 2 वेळा पोर्णिमा आहेत. त्यामुळे महिन्यात दुसऱ्यांदा सूपरमून दिसणार आहे. तज्ज्ञांनुसार, सूपरमूनचं दर 3 वर्षांनी एकदा दर्शन होतं. याआधी सूपरमूनचं दर्शन हे 2021 मध्ये झालं होतं. तर 30 ऑगस्टनंतर थेट 2026 मध्ये सूपरमून पाहायला मिळणार आहे.
शास्त्रज्ञांनुसार, आज दिसणारा सूपरमून हा इतर दिवस दिसणाऱ्या चंद्राच्या तुलनेत 14 टक्के मोठा दिसणार आहे.
Tomorrow (Tuesday Aug 1, 2023) night there will be a Supermoon (or Sturgeon moon). It will be (up to 14%) bigger and brighter than usual as it is closer than usual. This photo was taken 7/31/23 over @PennStHershey pic.twitter.com/G34Mq86RMx
— Jonathan Foulds PhD (@JonathanFoulds) August 1, 2023
सूपरमून ही चंद्रासंदर्भात दुर्मिळ घटना आहे. सूपरमून दरम्यान चंद्र इतर दिवसांच्या तुलनेत आकाराने मोठा दिसतो. शास्त्रज्ञांनुसार, आज 1 ऑगस्ट रोजी चंद्र पृथ्वीपासून 357,530 किमी इतका लांब असेल. त्यामुळे याला सूपरमून म्हटलं जातं.
ज्योतिष शास्त्रानुसार, सूपरमूनच्या वेळेस चंद्र मकर राशीत असेल. त्यामुळे काही राशींसाठी ही वेळ फार आव्हानात्मक असेल. मात्र नातेसंबंध आणि आर्थिक परिस्थितीसाठी ही वेळ फायदेशीर ठरु शकते. तसेच काही सूपरमून दरम्यान काही राशींच्या लोकांना जपूण राहण्याचा सल्लाही आहे, कारण या दरम्यान अनेक गुपित उघड होण्याची शक्यता आहे.
स्पेस डॉट कॉम या वेबसाईटनुसार, भारतीय वेळेनुसार, 2 ऑगस्ट रोजी 12 वाजून 1 मिनिटांनी या सूपरमूनचा उदय होईल. तर बुधवारी मध्यरात्री 2 वाजून 41 मिनिटांनी सूपर मूनचा अस्त होईल.