
सध्या भारत पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात तणाव पाहायला मिळत आहे. त्यातच आता जम्मू-काश्मीरमधील सांबा जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात संशयित ड्रोन पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाली असून भारतीय सुरक्षा दलांनी तात्काळ या ड्रोनवर कारवाई केली. मात्र, परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
संरक्षण विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधील सांबा जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात संशयित ड्रोन पाहायला मिळाले आहेत. भारतीय सुरक्षा दलांनी तात्काळ या ड्रोनवर कारवाई सुरू केली. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सध्याच्या तणावाच्या परिस्थितीत ही घटना घडल्यामुळे सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. मात्र, परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेने याबद्दलचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओनुसार, सांबा या ठिकाणी संशयित पाकिस्तानी ड्रोनवर कारवाई सुरु आहे. भारतीय सुरक्षा दलाकडून ही कारवाई केली जात आहे. या व्हिडिओमध्ये आकाशात फायरिंग आणि स्फोटांचे आवाज स्पष्टपणे ऐकू येत आहेत. भारतीय जवानांनी प्रभावीपणे ड्रोनला हवेतच रोखल्याचे सांगितले जात आहेत.
#WATCH | J&K: Red streaks seen and explosions heard as India’s air defence intercepts Pakistani drones amid blackout in Samba.
(Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/EyiBfKg6hs
— ANI (@ANI) May 12, 2025
यापूर्वी ८ मे रोजी सांबा सेक्टरमध्ये भारताने पाकिस्तानी ड्रोन पाडले होते. तसेच, काही दिवसांपूर्वी जम्मू, अखनूर, नगरोटा, अमृतसर आणि पठाणकोट या सीमावर्ती भागांमध्येही ड्रोन पाहायला मिळाले होते. २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर अचूक हवाई हल्ले केले होते. यानंतर पाकिस्तानकडून सीमावर्ती भागात ड्रोन हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आज सांबा येथे ड्रोन दिसल्याने भारतीय सुरक्षा दल अधिक सतर्क झाले आहेत. तसेच जम्मू काश्मीरमधील सीमाभागातील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यात आली आहे.