CM Vijay : मुख्यमंत्री विजय यांची स्वातंत्र्य दिनानिमित्त ऐतिहासिक घोषणा; महिला आणि झेन-जीमध्ये आनंदाचं वातावरण

मुख्यमंत्री विजय यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त ऐतिहासिक घोषणा केली आहे. त्यांच्या घोषणेने महिला आणि झेन-जीमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे.

CM Vijay : मुख्यमंत्री विजय यांची स्वातंत्र्य दिनानिमित्त ऐतिहासिक घोषणा; महिला आणि झेन-जीमध्ये आनंदाचं वातावरण
cm vijay news
Image Credit source: tv
| Updated on: Aug 15, 2026 | 1:27 PM

तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्वात मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री म्हणून स्वातंत्र्य दिनी जनतेला संबोधित करताना ऐतिहासिक घोषणा केली. या भाषणादरम्यान जेन-झींना विशेष नमस्कार केला. जगभरातील असलेल्या तामिळ भाषिक नातेवाईक आणि जेन-झी मित्रांना नमस्कार, असे मुख्यमंत्री विजय यांनी म्हटलं.

स्वातंत्र्य दिनाच्या पहिल्याच भाषणात प्रशासकीय कामात केंद्र सरकारला सहकार्याचं आश्वासन दिलं. परंतु राज्य सरकारच्या हिताच्या विरोधात असणाऱ्या धोरणांचा विरोध केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. विजय यांनी पुढे म्हणाले, ‘आम्ही भ्रष्टाचार मुक्त सरकार स्थापन करण्याच्या मोडमध्ये काम करत आहे. आमचं सरकार कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार सहन करणार नाही. भ्रष्टाचार करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल’.

माजी सैनिकांच्या कुटुंबानाही मदत मिळणार 

राजकीय मतभेद बाजूला ठेवत म्हटलं की, मागील सरकारच्या चांगल्या योजना पुढेही राबवण्यात येईल. यात एआयडीएमके सरकारच्या अम्मा कँटीन आणि डीएमके सरकारच्या सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना नाश्ता देणाऱ्या योजनेचा समावेश आहे. पुढे सांगितले की, सीएन अन्नादुरै यांच्या जयंतीदिनी म्हणजे 15 सप्टेंबर रोजी सुवर्ण अंगठी योजनेचा शुभारंभ केले जाईल. 755.83 कोटींच्या योजनेअंतर्गत सरकारी रुग्णालयात जन्माला आलेल्या नवजात बालकांना सोन्याची अंगठी दिली जाणार आहे. याशिवाय माजी सैनिकांच्या मुलींना लग्नासाठी देण्यात येणारं आर्थिक सहाय्य 25000 रुपयांवरून 50000 रुपयांपर्यंत वाढवण्यात आलं.

दिव्यांग माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना महिन्याला 5000 रुपयांवरून 7 हजार वाढ करण्यात आली आहे. तर स्वातंत्र्यसैनिकांचे निवृत्तीवेतन 23000 पर्यंत वाढवण्यात आले आहे. तर त्यांच्या कुटुंबीयासाठी निवृत्तीवेतन 12,500 रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहे. भाषणाचा समारोप करताना मुख्यमंत्री विजय यांनी तामिळनाडूमधील जनतेचे आभार मानले. तामिळनाडूतील जनतेने जात, धर्म, पैशांचं राजकारण नाकारल्याचे सांगितले. तर लोकांनी जनता केंद्रीत आणि सामाजिक न्यायावर आधारित सरकार बनवण्याच पाठिंबा दिल्याचेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री विजय यांनी केलेल्या घोषणेचं तामिळनाडूतील जनतेकडून स्वागत केलं जात आहे. विजय यांनी केलेल्या घोषणेची अंमलबजावणी कशी केली जाते, याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us