AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तामिळनाडूचे CM विजय थलपती यांचा घटस्फोट होणार नाही ! पत्नीची कोर्टातून अचानक माघार…

तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय थलपती यांची पत्नी संगिता हीने अभिनेत्री तृष्णा यांच्या त्यांचे संबंध असल्याचे कळाल्यानंतर कोर्टात घटस्फोटासाठी फेब्रुवारी २०२६ मध्ये याचिका दाखल केली होती, आता ही याचिका संगिता यांनी मागे घेतली आहे...

तामिळनाडूचे CM विजय थलपती यांचा घटस्फोट होणार नाही ! पत्नीची कोर्टातून अचानक माघार...
vijay thalapathy and sangeetha divorce case
| Updated on: Aug 07, 2026 | 6:02 PM
Share

तामिळनाडुचे मुख्यमंत्री सी.जोसेफ विजय आणि त्यांची पत्नी संगिता याच्या दरम्यान सुरु असलेल्या घटस्फोटाच्या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. गेल्या काही महिन्यांपासून दोघे वेगळे होणार असल्याची चर्चा होती. परंतू आता संगिता चेंगलपट्टू यांनी कोर्टात दाखल केला घटस्फोटाचा अर्ज मागे घेतला आहे. त्यानंतर कोर्टाने देखील हे प्रकरण आता संपूर्णपणे बंद केले आहे.

7 ऑगस्ट रोजी सुनावणी दरम्यान संगिता यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टाशी संवाद साधला आणि त्यांनी हा खटला पुढे न नेण्याचे कारण सांगितले.

घटस्फोटाचा अर्ज मागे

बातम्यानुसार संगिता चेंगलपट्टू यांनी कोर्टात या प्रकरणाची सुनावणी सुरु झाली, संगिता चेंगलपट्टू यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सादर होत आपला पक्ष ठेवला. त्यांनी जजच्या समोर स्पष्ट केले की त्या आता ही केस पुढे चालवू इच्छीत नाही आणि यामागचे कारण देखील त्यांनी कोर्टाला सांगितले.

कोर्टाच्या अधिकृत सूत्रांनी दुजोरा दिला की संगिता चेंगलपट्टू यांचे म्हणणे ऐकल्यानंतर कोर्टाने अर्ज मागे घेतल्याचे मानून या प्रकरणाचा निपटारा केला आहे. याच्या आधी १५ जून रोजी स्थानिक कोर्टाने या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलत पुढील तारीख ७ ऑगस्ट मुक्रर केली होती

फेब्रुवारी २०२६ मध्ये दाखल केली होती याचिका

विजय आणि संगिता यांच्या या कायदेशीर लढाईची सुरुवात फेब्रुवारी २०२६ मध्ये झाली होती. जेव्हा संगिता यांनी स्पेशल मॅरेज एक्ट, १९५४ अंतर्गत चेंगलपट्टू कोर्टात धाव घेतली होती. आपल्या याचिकेत त्यांनी या विवाहाला समाप्त करण्याची मागणी केली होती. संगिता यांचे म्हणणे होते की दोघांच्या दरम्यान आता सर्व काही ठिक राहिलेले नाही. आणि हा विवाह संपल्यात जमा झाला आहे. अर्जात संगिता यांनी विजय याच्यावर विवाहबाह्य संबंध, मानसिक छळ, उपेक्षा आणि साथ सोडणे सारखे गंभीर आरोप केले होते.

याचिकेत गंभीर आरोप

बातमीनुसार संगिता यांनी त्यांच्या याचिकेत दावा केला होता की त्यांना २०२१ मध्ये कळाले की विजय यांचा एका अभिनेत्री सोबत अफेअर चालू आहे. संगिता यांचा आरोप होता की विजय याने हे नाते संपविण्याचे आश्वासन दिले होते, परंतू तरीही हे नाते सुरुच ठेवले. यामुळे आपल्या प्रचंड मोठ्या मानसिक ताणतणावातून जावे लागले. याचिकेत हे देखील म्हटले होते की विजय हळूहळू कुटुंबापासून दूर होत गेले, संगिता यांना त्यांच्या प्रोफेशनल आणि सार्वजनिक कार्यक्रमातून वेगळे केले आणि भावनात्मक, शारीरिक आणि आर्थिक रुपाने सहकार्य केले बंद केले.

१९९८ मध्ये झाले लग्न आणि दोन मुले

विजय आणि संगिता यांचे नाते खुप जुने आहे. दोघांचे लग्न सर्वात आधी १९९८ मध्ये युकेत रजिस्टर झाले होते. त्यानंतर १९९९ मध्ये चेन्नईत संपूर्ण पारंपारिक रितीरिवाजात त्यांनी सात फेरे घेतले. या लग्नातून त्यांना दोन मुले झाली. मुलगा संजय आणि मुलगी दिव्या साशा. दोघांनी प्रदीर्घकाळ आनंदात कौटुंबिक वैवाहिक जीवन साजरे केले. मात्र, काही वर्षांनी त्यांच्या नात्यात अंतर आले.

अफवांवर याचिकेत लागली मोहर

संगिता या जेव्हा सार्वजनिक कार्यक्रम आणि विजय याच्या कौटुंबिक आयोजनात दिसणे बंद झाला, तेव्हा त्यांच्या वेगळे होण्याच्या चर्चांना सुरुवात झाली होती. मात्र, संगिता यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावे पर्यंत दोघांपैकी कोणीही या बेबनावाविषयी अधिकृतपणे बोलले नव्हते. कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दाखल झाल्यानंतर ही गोष्ट स्पष्ट झाली की दोघांच्या नात्यात कटुता आल्याचे स्पष्ट झाले. आता संगिता यांनी अर्ज मागे घेतल्याने या खटल्याला पुन्हा वेगळे वळण लागले आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?