पद्मविभूषण पुस्कार विजेत्या, प्रसिद्ध गायिकेचं निधन; संगीत क्षेत्रात शोककळा
teejan bai death : प्रसिद्ध पांडवाणी गायिका तीजन बाई यांचं निधन झालं, त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

भारतीय संगीत क्षेत्रातून दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध गायिका, पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित झालेल्या तीजन बाई यांचं निधन झालं. रायपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) रुग्णालयात त्यांनी वयाच्या 70 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तीजन बाई या मागील काही आठवड्यांपासून रायपूरच्या एम्स रुग्णालयात उपचार घेत होत्या. त्या गंभीर आजाराशी झुंज देत होत्या. मात्र, आज पहाटे 3.15 वाजता त्यांची तब्येत बिघडली. त्यानंतर त्यांनी रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनांतर छत्तीसगडसहित संपूर्ण देशातील सांस्कृतिक आणि कला क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
https://x.com/OPChoudhary_Ind/status/2073600830146830562
तीजन बाई प्रेक्षकांना करायच्या मंत्रमुग्ध
छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यात गनियारी गावात 1956 साली तीजन बाई यांचा जन्म झाला. त्यांच्या आयुष्याचा प्रवास फार संघर्षमय होता. त्यांनी ‘पांडवाणी’ या लोककलेला जतन करत नवा आयाम दिला. तीजन बाई यांनी पांडवाणीची ‘कापालिका शैली’ स्वीकारली होती. परंपरेला छेद नव्या क्षेत्रात उतरलेल्या तीजन बाई यांना सुरुवातीला मोठ्या विरोधाचा सामना करावा लागला. त्यांनी दमदार आवाज, अभिनय कौशल्य आणि हातातील तानपुऱ्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करायच्या.
सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार प्राप्त गायिका
5 दशकांहून अधिक काळ कलेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत राहिल्या. छत्तीसगडमधील ही कला त्यांनी केवळ देशभरात नव्हे, तर आशिया, युरोपसह जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं. सुरुवातीच्या काळात होणार्या विरोधाला न जुमानल्या नाहीत. त्यांनी खऱ्या अर्थाने पांडवाणीचे जतन केलं. तसेच या पांडवाणीला लोकप्रिय केलं. त्यांनी कलाकारांच्या अनेक पिढ्यांच्या मार्गदर्शक ठरल्या. भारताच्या छत्तीसगडमधील पांडवाणी कलेला जगात एक वेगळी ओळख करून दिली. लोकसंस्कृती, कला क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल तीजनबाईंचा सरकारनेही गौरव केला. त्यांना पद्मश्री (1987/88), पद्मभूषण (2003), पद्मविभूषण (2019), संगीत नाटक अकादमी पुरस्कार यांसह देशाचे सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला होता. त्यांच्या निधनाने सर्वत क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती त्यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहू लागले आहेत.