Helicopter Crash Photo | तेलंगणात हेलिकॉप्टर कोसळलं, नलगोंडा जिल्ह्यात भीषण दुर्घटना, दोन पायलट्सचा मृत्यू!

प्राथमिक माहितीनुसार, हेलिकॉप्टर दुर्घटनेत एका प्रशिक्षणार्थी महिला पायलटसह आणखी एका पायलटचा मृत्यू झाला आहे. वीजेच्या तारांना स्पर्श झाल्याने हेलिकॉप्टर दुर्घटना झाली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Helicopter Crash Photo | तेलंगणात हेलिकॉप्टर कोसळलं, नलगोंडा जिल्ह्यात भीषण दुर्घटना, दोन पायलट्सचा मृत्यू!
| Edited By: | Updated on: Feb 26, 2022 | 2:38 PM

नलगोंडाः तेलंगणातील (Telangana helicopter crash ) नलगोंडा जिल्ह्यात (Nalgonda District) शनिवारी एका प्रशिक्षणार्थी हेलिकॉप्टरचा अपघात झाला. या दुर्घटनेत एका प्रशिक्षणार्थीसह दोन पायलट्सचा (Two Pilot) मृत्यू झाला. हेलिकॉप्टरमध्ये बिघाड होऊन ते नलगोंडा जिल्ह्यात कोसळले. हेलिकॉप्टर कोसळण्याचा आवाज एवढा भयंकर होता की, आजूबाजूचे नागरिक भीतीने तेथे गोळा झाले. एका वृत्तानुसार, ही दुःखद घटना कृष्णा नदीवरील नागार्जुनसागर धरणाच्या जवळ पेद्दावुरा ब्लॉकमधील तुंगतुर्थी गावात घडली.

प्रत्यक्षदर्शी सांगतात..

नलगोंडा जिल्ह्यात झालेल्या भयंकर दुर्घटनेत दोन पायलट्सचा मृत्यू झाला. त्यापैकी एक महिला प्रशिक्षणार्थी होती, अशी प्राथमिक माहिती हाती आली आहे. ही घटना तुंगतुर्थी गावात घडली असून सकाळच्या वेळी एकदम मोठा स्फोट झाल्यासारखा आवाज झाला. शेतकऱ्यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली तेव्हा एक हेलिकॉप्टर कोसळलेले दिसले. हेलिकॉप्टरमधून धूर निघत होता. प्रत्यक्षदर्शींनी घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना दिली. नलगोंडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

प्राथमिक माहितीनुसार, हेलिकॉप्टर दुर्घटनेत एका प्रशिक्षणार्थी महिला पायलटसह आणखी एका पायलटचा मृत्यू झाला आहे. वीजेच्या तारांना स्पर्श झाल्याने हेलिकॉप्टर दुर्घटना झाली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

इतर बातम्या-

औरंगाबाद जिल्ह्यातील 5 लाख मुलांना उद्या पोलिओचा डोस, जिल्हा प्रशासन व महापालिकेची जय्यत तयारी

PHOTO | बाप रे बाप! कोल्हापुरात महावितरण अधिकाऱ्यांच्या टेबलावर शेतकऱ्यांनी सोडले साप