अनंतनागमध्ये सीआरपीएफच्या पथकावर दहशतवादी हल्ला, पाच जवान शहीद

अनंतनागमध्ये दुचाकीवर आलेल्या दोघांनी अचानक सीआरपीएफ आणि पोलिसांवर गोळीबार सुरु केला. यामध्ये सीआरपीएफचे जवान, पोलीस दलातील एसएचओ जखमी झाले. शहिदांमध्ये एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाचाही समावेश आहे.

अनंतनागमध्ये सीआरपीएफच्या पथकावर दहशतवादी हल्ला, पाच जवान शहीद

श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये बुधवारी दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या पथकावर हल्ला केला. अनंतनागमध्ये बस स्टँडजवळ झालेल्या या हल्ल्याच सीआरपीएफच्या 5 जवानांना वीरमरण आलंय, तर तर 3 जण जखमी आहेत. दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. अनंतनागमध्ये दुचाकीवर आलेल्या दोघांनी अचानक सीआरपीएफ आणि पोलिसांवर गोळीबार सुरु केला. यामध्ये सीआरपीएफचे जवान, पोलीस दलातील एसएचओ जखमी झाले. शहिदांमध्ये एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाचाही समावेश आहे.

अनंतनागच्या एसएचओला छातीत गोळी लागल्याने ते गंभीर जखमी आहेत. उपचारासाठी त्यांना श्रीनगरला हलवण्यात आलंय. या दहशतवाद्यांमध्ये एका महिलेचाही समावेश होता. गोळी लागून एका दहशतवाद्याचा खात्मा झाला, तर आणखी एकाचा शोध सुरु आहे.

यापूर्वी जम्मू काश्मीरच्या पुँछ सेक्टरमध्ये पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं होतं, ज्यात एक जवान शहीद झाला, तर एक जवान जखमी झाला. भारतीय सैन्याकडूनही पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्यात आलं. पाकिस्तानकडून अनेकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलंय. विशेष म्हणजे ईदच्या दिवशीही पाकिस्तानने गोळीबार केला होता. या दिवशी शांतता ठेवण्यासाठी सैन्याकडून प्रयत्न सुरु होते, पण पुलवामामध्ये सैन्यावर दगडफेक करण्यात आली.

सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानने 6 जूनपासून आतापर्यंत 1170 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. यावर्षी दहशतवादी कारवायांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट असल्याचं गृह मंत्रालयाने 12 डिसेंबर 2018 रोजी म्हटलं होतं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *