थलपती विजय यांची खास मैत्रीण त्रिशा कृष्णनला विरोधी पक्षाची मोठी ऑफर, देणार तब्बल एवढे कोटी

मोठी बातमी समोर येत आहे, थलपती विजय यांनी डीएमके आणि एआयएडीएमकेला पराभवाचा मोठा धक्का दिला, त्यानंतर आता विरोधकांकडून थलपती विजय यांची मैत्रीण त्रिशा कृष्णनला मोठी ऑफर देण्यात आली आहे.

थलपती विजय यांची खास मैत्रीण त्रिशा कृष्णनला विरोधी पक्षाची मोठी ऑफर, देणार तब्बल एवढे कोटी
त्रिशा कृष्णनला विरोधी पक्षाकडून मोठी ऑफर
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 13, 2026 | 3:02 PM

तामिळ चित्रपटसृष्टीमध्ये सध्या त्रिशा कृष्णन चर्चेचा केंद्रबिंदू आहे. त्रिशा कृष्णन ही तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री थलपती विजय यांची मैत्रीण आहे. थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षानं तामिळनाडू विधानसभा निवडणुकीमध्ये मोठं यश मिळवलं. टीव्हीकेनं तामिळनाडूमध्ये तब्बल 108 जागांवर विजय मिळवला. त्यानंतर थलपती विजय यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ देखील घेतली. दरम्यान थलपती विजय यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्यात त्रिशा कृष्णन चांगलीच भावुक झाल्याचं पहायला मिळालं. जेव्हापासून विजय थलपती यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तेव्हापासून त्रिशा कृष्णन चांगलीच चर्चेमध्ये आहे. आता एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे थलपती विजय यांचा राजकारणात प्रतिस्पर्धी असलेला पक्ष डीएमकेचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी त्रिशा कृष्णनला मोठी ऑफर दिली आहे.

तामिळनाडूच्या राजकारणात या ऑफरची जोरदार चर्चा रंगली आहे. उदयनिधी स्टॅलिन यांनी त्रिशा कृष्णनला एका चित्रपटासाठी तब्बल 12 कोटी रुपयांची ऑफर दिली आहे. या बातमीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितनुसार सध्या उदयनिधी स्टॅलिन एका मोठ्या प्रोजेक्टवर काम करत आहेत, आणि त्याचाच एक भाग म्हणून त्रिशा कृष्णनला चित्रपटासाठी तब्बल 12 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली आहे. या चित्रपटामध्ये त्रिशा कृष्णन ने लीड रोड करावा अशी उदयनिधी स्टॅलिन यांची इच्छा आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार त्रिशा कृष्णनने यावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्रिशा कृष्णन या चित्रपटाची ऑफर स्विकारणार की नाकारणार? याकडे आता संपूर्ण तामिळ चित्रपटसृष्टीचं लक्ष लागलं आहे. दक्षिण चित्रपट सृष्टीमध्ये त्रिशा कृष्णन हिचं मोठं नाव आहे, तिची भूमिका असलेले अनेक चित्रपट हीट ठरले आहेत. तीने थलपती विजय यांच्यासोबत देखील काही चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र सध्या आता या ऑफरची जोरदार चर्चा सुरू आहे. तामिळनाडूच्या राजकारणात मोठी उलथापालथ पहायला मिळत आहे. टीव्हीकेनं डीएमके, आणि एआएएडीएमके सारख्या प्रस्तापीत पक्षांचा पराभव केला आहे. थलपती विजय हे तामिळनाडूचे मुख्यमंत्री बनले आहेत, आणि त्रिशा ही थलपती विजय यांची चांगली मैत्रीण आहे.  या सर्व पार्श्वभूमीवर  ती आता विरोधी पक्षाकडून आलेली ही ऑफर स्विकारणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Follow Us