
संदीप राजगोळकर, टीव्ही 9 मराठी, नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांपूर्वी चित्रपटगृहात अन्नपदार्थ आणि पेय नेन्यावरून चांगलाच वाद उफाळून आला होता. चित्रपटगृहात मिळणाऱ्या अन्नपदार्थ आणि पेयाची किंमतीवरुन अनेकांनी आक्षेप घेतला होता. काहींनी याबाबत थेट पोलीस ठाणे गाठले होते तर काहींनी याबाबत थेट कोर्टात धाव घेतली होती. यामध्ये जम्मू काश्मीर मध्ये जुलै 2018 मध्ये उच्च न्यायालयाने निर्देशही दिले होते. त्यामध्ये मल्टिप्लेक्स आणि सिनेमागृहांनी येणाऱ्या प्रेक्षकांना त्यांच्याकडील अन्नपदार्थ आणि पाणी आत आणण्यास प्रतिबंध करू नये असा निकाल दिला होता. त्यावरून संपूर्ण देशात चित्रपटगृहाच्या मालकांना एकप्रकारे दणका आणि प्रेक्षकांना याबाबत मोठा दिलासा दिल्याचे बोललं जाऊ लागलं होतं. त्यामुळे चित्रपटगृहात जातांना खाद्यपदार्थ आणि पेय घेऊन जाण्यास कुणीही प्रतिबंध करत नव्हते. पण आता प्रतिबंध करू शकणार आहे. नुकताच सर्वोच्च न्यायलयाने तसा निकाल दिला असून जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवले आहे.
चित्रपटगृहात अन्नपदार्थ आणि पेय यांच्या विक्रीबाबतचे नियम ठरविण्याचे अधिकार चित्रपटगृहाच्या मालकांना आता असणार आहे.
बाहेरील अन्नपदार्थ आणण्यास मुभा द्यायची की नाही, याबाबतही मालक निर्णय घेऊ शकतात, अस सर्वोच्च न्यायालयान म्हटलं आहे.
जम्मू काश्मीर मध्ये जुलै 2018 मध्ये उच्च न्यायालयाने निर्देशही दिले होते. त्यामध्ये मल्टिप्लेक्स आणि सिनेमागृहांनी येणाऱ्या प्रेक्षकांना त्यांच्याकडील अन्नपदार्थ आणि पाणी आत आणण्यास प्रतिबंध करू नये असा निकाल दिला होता.
जम्मू काश्मीर न्यायालयाने दिलेले निर्दश सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवत चित्रपटगृहाच्या मालकांना मोठा दिलासा दिला आहे.