भारतामधील असं एक गाव, जिथे परदेशी महिला फक्त गर्भधारणेसाठीच येतात, नेमकं कारण काय?
जगभरामध्ये अनेक प्रथा परंपरा आहेत, प्रत्येक प्रथा परंपरांमागे एक विशिष्ट कारण देखील आहे. भारतामध्ये तर अनेक प्रथा, परंपराचंं पालन केलं जातं. भारतामधील असे अनेक गावं आहेत, जे विशिष्ट परंपरांसाठी ओळखले जातात.

भारतामध्ये अनेक प्रथा परंपरांचं पालन केलं जातं, या प्रथा परंपरा त्या विशिष्ट प्रदेशाची ओळख असतात. प्रत्येक प्रथा परंपरांमागे, त्याचं पालन करण्यामागं काहीतरी विशिष्ट कारण देखील असतं. आज अशा काही प्रथा आहेत, ज्या काळाच्या ओघात आउडेटेड झाल्या आहेत, मात्र तरी देखील त्यांचं पालन केलं जातं. भारतामधील अशी अनेक गाव आहेत, त्या गावांना तेथील विशिष्ट प्रथा परंपरांसाठी ओळख जातं. या गावाला भेट देण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक येतात. पर्यटनाच्या माध्यमातून येथील स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी देखील निर्माण होतात. अशा गावांबद्दल कायमच पर्यटकांच्या मनात आकर्षक असतं. असंच भारतामध्ये एक गाव आहे, जिथे परदेशी महिला फक्त गर्भधारणेसाठीच येतात. अनेक वर्षांपासून ही प्रथा सुरू असल्याचा दावा केला जातो.
हे गाव लडाखमध्ये आहे. कारगिलपासून अवघ्या 70 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. आर्य व्हॅली म्हणून या संपूर्ण प्रदेशाला ओळखलं जातं. या आर्य व्हॅलीमध्ये ब्रोकपा जमातीचे लोक राहतात. या लोकांची शरीरयष्टी देखील थोडी वेगळी आहे. हे लोक स्वत:ला अलेक्झांडर द ग्रेटच्या सैन्याचे वंशज मानतात. अलेक्झांडर द ग्रेट जेव्हा भारतामध्ये आला होता, तेव्हा त्याचे काही सैनिक इथेच वास्तव्याला राहिले आणि त्याच सैन्याचे आम्ही वंशज आहोत, असं हे लोक मानतात. आर्य व्हॅली या गावाचे नियम देखील अत्यंत कडक आहेत.
दरम्यान आपल्याही पोटी अलेक्झांडर द ग्रेटच्या सैन्याचे वंशज जन्माला यावेत अशी अनेक परदेशी महिलांची इच्छा असते, त्यामुळे त्या केवळ आर्य व्हॅलीमध्ये फक्त गर्भधारणेसाठीच येतात, असं मानलं जातं. या महिला येथील पुरुषांसोबत शरीरसंबंध ठेवतात, त्याबदल्यात त्या त्यांना महागडे गिफ्ट आणि पैसे देखील देतात. आर्य व्हॅली हा एक लडाखमधील अत्यंत सुंदर असा प्रदेश आहे. पर्यटनासाठी देखील हा भाग ओळखला जातो. दरवर्षी हजारो पर्यटक सुद्धा आर्य व्हॅलीला भेट देतात. मात्र त्याही पेक्षा या गावाची चर्चा होते ती म्हणजे येथे येणाऱ्या परदेशी महिलांमुळे.