Narendra Modi यांच्या नेतृत्वात अन्नदात्यांच्या हिताशी तडजोड नाहीच, मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सुनावले, राहुल गांधींवर तो सर्वात मोठा आरोप

Dharmendra Pradhan on Rahul Gandhi: राहुल गांधी यांनी अमेरिका-भारत व्यापारी करारावर सडकून टीका केली आहे. त्यांनी सरकारने देश गहाण ठेवल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यावर मोदी सरकारमधून पलटवार सुरू आहेत. शिक्षण आणि कौशल्य विकास खात्याचे मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी सोशल मीडियावर भावना व्यक्त केल्या आहेत.

Narendra Modi यांच्या नेतृत्वात अन्नदात्यांच्या हिताशी तडजोड नाहीच, मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सुनावले, राहुल गांधींवर तो सर्वात मोठा आरोप
राहुल गांधी, धर्मेंद्र प्रधान
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Feb 13, 2026 | 2:30 PM

Dharmendra Pradhan on Rahul Gandhi: राहुल गांधी यांनी अमेरिका आणि भारत व्यापारी करारावर सडकून टीका केली आहे. त्यांनी सरकारवर देश अमेरिकेसमोर गहाण टाकल्याचा आरोप केला. या व्यापारी करारामुळे देशातील शेतकर्‍यांवर संकट येण्याचा इशाराही राहुल गांधी यांनी दिला आहे. त्यावर आता मोदी सरकारमधून पटलवार सुरू आहे. लोकसभेत राहुल गांधी यांनी सरकारवर निशाणा साधल्यावर त्यांच्यावर सत्ताधारी तुटून पडले. त्यांची खासदारकीच रद्द करण्याची नाही तर त्यांनी निवडणूक लढण्यास आजीवन बंदी घाला अशी मागणी करण्यात आली. सरकारने त्यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव आणणे टाळले आहे. दरम्यान शिक्षण आणि कौशल्य विकास खात्याचे मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राहुल गांधी यांच्या विधानाचा समाचार घेतला. त्यांनी सोशल मिडिया ट्विटर आताचे एक्सवर मोठे वक्तव्य केले आहे.

अन्नदात्यांच्या हितांशी कदापि तडजोड नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड करण्यात येणार नाही असे त्यांनी ठणकावले. भारत आपल्या ‘अन्नदात्यांच्या’ हितांशी कधीही तडजोड करणार नाही. देशातील शेतकर्‍यांचे हित पूर्णपणे सुरक्षित आहे, दुग्ध आणि कुक्कुटपालन क्षेत्र सुरक्षित आहे असा दावा त्यांनी केला. देशाची निर्यात वाढत आहे, यामुळे थेट उपजीविकेला बळकटी मिळत असल्याचे धर्मेंद्र प्रधान म्हणाले. तर जागतिक पातळीवर भारताचा ऐतिहासिक विजय झाला आहे. अमेरिकेत वस्त्र आणि कापड निर्यातीसाठी शुल्कमुक्त प्रवेश मोदी सरकारने सुनिश्चित केला आहे. उद्योग,उत्पादन क्षेत्र आणि जागतिक आर्थिक धोरणात भारताची ठसठशीत मोहर उमटल्याचा दावा प्रधान यांनी केला.

राहुल गांधींचा खच्चीकरणाचा प्रयत्न

मोदींच्या या ठोस कामगिरीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी आणि Indian National Congress ,काँग्रेस सातत्याने नकारात्मकता पसरवत असल्याचा आरोप प्रधान यांनी केला. ते केवळ दिशाभूल, दिखावा आणि फूट पाडणारे राजकारण करत आहेत. शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्नांवर उपाय करण्यासाठी त्यांनी काहीही केलेले नाही. उलट भारताच्या जागतिक यशाला कमी लेखण्याचा त्यांचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे. नागरिक आणि युवकांचा आत्मविश्वास कमी करण्याचा, खच्चीकरणाचा त्यांचा वारंवार प्रयत्न दिसून येत आहे. राहुल गांधी यांचे राजकारण उपायांवर नव्हे, तर नकार, विकृतीकरण आणि कृत्रिम रोष निर्माण करण्यावर आधारलेले असल्याचा आरोपही प्रधान यांनी केला.

राहुल गांधी जो दिखावा करत आहेत. खोटनाटे सांगत आहेत, त्याचा देशासमोर अनेकदा पर्दाफाश झाला आहे. काँग्रेस पक्ष हा विकासाऐवजी विभाजनाची वाट निवडत असल्याचा आरोपही त्यांनी केला. पण या अपयशाच्या राजकारणामुळे भारत थोडाही विचलित होणार नाही. देश आणि नागरिक आत्मविश्वासाने, नेटाने पुढे जातील आणि जागतिक स्तरावर देशाचं नाव उंचवलं जाईल असा विश्वास धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केला.