Stray dogs: देशात भटक्या कुत्र्यांची दहशत, उ. प्रदेश, महाराष्ट्रासह या राज्यांत सर्वाधिक डॉग बाईटच्या केसेस, दररोज घडतायेत 12 हजार घटना

| Updated on: Aug 21, 2022 | 8:06 PM

गेल्या साडे तीन वर्षांत भटके कुत्रे आणि प्राण्यांनी चावा घेतल्याच्या देशभरात 1कोटी 60 लाख 62 हजार 815 प्रकरणे समोर आली आहेत. या सगळ्याची दिवसाची सरासरी विचारात घेतली तर ती साधारणपणे 12 हजार 256 इतकी मोठी आहे.

Stray dogs: देशात भटक्या कुत्र्यांची दहशत, उ. प्रदेश, महाराष्ट्रासह या राज्यांत सर्वाधिक डॉग बाईटच्या केसेस, दररोज घडतायेत 12 हजार घटना
कुत्र्याच्या चावांच्या घटनेत वाढ
Image Credit source: social media
Follow us on

नवी दिल्ली – देशात भटक्या कुत्र्यांची दहशत झपाट्याने वाढते आहे. गेल्या साडे तीन वर्षांत भटकी कुत्री आणि इतर प्राण्यांनी माणसांना किंवा इतर प्राण्यांना चावा घेतल्याच्या घटना वाढत चाललेल्या आहेत. दररोज सरासरी अशा चावा घेतल्याच्या सरासरी 12, 256  घटना दाखल केल्या जात आहेत. हा आकडा धक्कादायक असाच म्हणायला हवा. यातील सर्वाधिक प्रकरणे ही महाराष्ट्र, उ. प्रदेश, तामिळनाडू, गुजरात, प. बंगाल आणि आंध्रप्रदेशात दाखल करण्यात येत आहेत. केंद्र सरकारच्या वतीने ही माहिती देण्यात आली आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात खासदार ए एम आरिफ यांच्या प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात केंद्रीय पशुपालन आणि डेअरी मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी ही माहिती दिली आहे.

नेमके काय आहेत आकडे?

आयडीएसपी आणि आयएचआयपीच्या माहितीनुसार,

  1. 2019साली प्राण्यांकडून चावा घेतल्याच्या 72 लाख 77 हजार 523 प्रकरणे घडली आहेत.
  2. 2020 साली ही संख्या 46 लाख 33 हजार 493 इतकी आहे.
  3. हे सुद्धा वाचा
  4. 2021 साली 17 लाख 01 हजार 133 प्रकरणे समोर आली आहेत.
  5. जुलै 2022 पर्यंत देशात 14 लाख 50 हजार 666 प्रकरणे समोर आलीत.
  6.  सरकारी आकडेवारीत दिलेल्या माहितीप्रमाणे, गेल्या साडे तीन वर्षांत भटके कुत्रे आणि इतर प्राण्यांनी चावा घेतल्याच्या सर्वाधिक घटना या उत्तर प्रदेशात घडलेल्या आहेत. 27.52 लाख जणांना चावा घेतल्याची प्रकरणे समोर आली आहेत.

या राज्यांत भटक्या प्राण्यांची सर्वाधिक दहशत

या आकडेवीरीत महाराष्ट्राचाही क्रमांक वरचा आहे. आपल्या राज्यातही चावा घेतल्याची अनेक प्रकरणे होत आहेत. गेल्या साडे तीन वर्षांच्या विचार केल्यास

  1. महाराष्ट्र- 15.75 लाख
  2. तामिळनाडू 20.70 लाख
  3. पश्चिम बंगाल- 12.09 लाख
  4. गुजरात – 11.09 लाख
  5. आंध्रप्रदेश- 9.51 लाख
  6.  बिहार- 5.57 लाख
  7. मध्य प्रदेश – 5.30 लाख
  8. ओडिशा- 3.91 लाख

गेल्या साडे तीन वर्षांत भटके कुत्रे आणि प्राण्यांनी चावा घेतल्याच्या देशभरात 1कोटी 60 लाख 62 हजार 815 प्रकरणे समोर आली आहेत. या सगळ्याची दिवसाची सरासरी विचारात घेतली तर ती साधारणपणे 12 हजार 256 इतकी मोठी आहे.

सरकारकडून राष्ट्रीय रेबीज नियंत्रण कार्यक्रम

डॉग बाईटसारख्या घटना थांबवण्यासाठी केंद्र सरकारनेही प्रयत्न सुरु केल्याची माहिती मंत्र्यांनी दिली आहे. देशात राष्ट्रीय रेबीज नियंत्रण कार्यक्रम सुरु करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे. नियमांनुसार अशा भटक्या प्राण्यांची लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्याची जबाबदारी ही स्थानिक प्रशासनाला आहे. याबाबत सरकारने पशु जन्म नियंत्रण नियम केला असून त्यात 2010 साली दुरुस्ती करण्यात आली आहे. मनुष्य आणि पशू यांच्यातील वाद कमी करण्यासाठी सामुदायिक प्राण्यांची दत्तक योजना सुरु करण्यावर भर असल्याचेही सांगण्यात आले आहे.