ही वनस्पती म्हणजे सापांचा अड्डाच, परिसरात एक तरी साप दिसणारच, घरात लावताना काळजी घ्या

अशा काही वनस्पती असतात ज्या आपल्या नैसर्गिक गुणधर्मांमुळे सापांना आपल्याकडे आकर्षित करतात. अशा झाडांच्या आसपास नेहमी साप आढळून येतात. त्यामुळे अशा वनस्पती घरात किंवा गार्डनमध्ये लावताना काळजी घ्यावी लागते. अशा वनस्पती म्हणजे सापांना घरात येण्याचं आमंत्रणच समजलं जातं.

ही वनस्पती म्हणजे सापांचा अड्डाच, परिसरात एक तरी साप दिसणारच, घरात लावताना काळजी घ्या
snake
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 13, 2026 | 6:16 PM

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्या घराच्या परिसरात आजूबाजूला अनेकदा साप आढळून येतात. यातील काही साप हे विषारी असतात, तर कही साप बिनविषारी असतात. पंरतु सापांच्या कोणत्या प्रजाती या विषारी आहेत? आणि कोणत्या बिनविषारी याचा आपला अभ्यास नसल्यामुळे आपण प्रत्येक सापाला विषारी समजण्याची चूक करतो. त्यामुळे अनेकदा आपल्याला साप दिसला की आपण त्याला मारतो. मात्र यामुळे सापांच्या अनेक दुर्मिळ प्रजाती या सध्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे तुम्हाला जर कुठेही साप आढळला तर त्याला न मारता त्याची माहिती सर्पमित्रांना द्या. सापांना पकडण्याचा प्रयत्न करू नका, कारण ते तुमच्या जीवावर देखील बेतू शकतं.

पावसाळ्याच्या काळात सापांच्या बिळात पाणी घुसतं, त्यामुळे ते जमिनीवर येतात. सापांना नेहमी जिथे आर्द्रता जास्त आहे, असं वातावरण अनुकूल असतं. त्यामुळे जर तुमच्या घरात असं वातावरण असेल तर साप अशा ठिकाणी आश्रय घेऊ शकतात. तसेच काही वनस्पतींची नैसर्गिक रचनाच अशी असते, की साप अशा वनस्पतींकडे आकर्षित होतात. काही वनस्पतींचे पानं ही दाट  असतात, अशा झाडांखाली लवकर पावसाचं पाणी पोहोचत नाही, त्यामुळे जागा कोरडी असते, तसेच पानं दाट असल्यामुळे लपण्यासाठी जागा देखील जास्त असते, त्यामुळे साप अशा ठिकाणी आश्रय घेतात. तसेच अशी देखील काही झाडं असतात, ज्या झाडाजवळ वेगवेगळ्या प्रकारचे किटकं बेडूक उंदिर येतात. त्यामुळे सापांना सहज त्याची शिकार येथे मिळते, त्यामुळे देखील साप अशा ठिकाणाकडे आकर्षित होतात.

यापैकीच एक झाड आहे, ते म्हणजे जुईचं झाड, जुईचा वेल हा असा वेल आहे, ज्याला पानांची संख्या ही खूप जास्त असते. तसेच या वेलामुळे मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होते. या वेलाच्या परिसरात उंदिर, घुशी आपली बिळं तयार करतात. त्यामुळे साप शिकारीच्या शोधात अशा वेलांकडे आकर्षित होतो. त्यामुळे असे वेल घरात लावताना काळजी घेतली पाहिजे, या वेलाभोवती अडचण होणार नाही, याकडे लक्ष असलं पाहिजे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us