आदिवासींकडे असलेलं हे खास लिक्विड म्हणजे सापांवर जालीम उपाय, पुन्हा साप दिसणारच नाही, जाणून घ्या कसं तयार करतात?

सध्या सर्वत्र पाऊस सुरू आहे, पावसाच्या दिवसांमध्ये घर आणि घराच्या परिसरात साप निघणं, ही एक सामान्य गोष्ट आहे. मात्र साप घरात येऊ नये यासाठी आज आपण एका खास लिक्विडची माहिती घेणार आहोत.

आदिवासींकडे असलेलं हे खास लिक्विड म्हणजे सापांवर जालीम उपाय, पुन्हा साप दिसणारच नाही, जाणून घ्या कसं तयार करतात?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 13, 2025 | 5:36 PM

सध्या सर्वत्र पाऊस सुरू आहे, पावसाच्या दिवसांमध्ये घर आणि घराच्या परिसरात साप निघणं, ही एक सामान्य गोष्ट आहे. कारण या काळात सापांच्या बिळात पाणी जातं, परिणामी साप बिळातून वर येतात. अनेकदा ते आपल्यासाठी सुरक्षित निवारा शोधण्यासाठी तुमच्या घरात देखील घुसतात. विशेष करून ग्रामीण भाग आणि आदिवासी तांड्यांवर सापाचा धोका अधिक असतो. पावसाळ्यात अनेकदा सर्पदंशाच्या घटना देखील घडतात, अशा परिस्थितीमध्ये सतर्कता हाच सापांपासून बचावाचा सर्वोत्तम मार्ग आहे. मात्र आदिवासी लोक सर्पदंशापासून वाचवण्यासाठी एक खास उपाय करतात, साप घरात घुसू नये, किंवा जर घरात साप असेल तर तो घरातून निघून जावा यासाठी आदिवासी समाजाकडून एक विशिष्ट प्रकारचं लिक्विड वापरं जातं. जाणून घेऊयात हे लिक्विड नेमकं कसं तयार करतात आणि त्याचा उपयोग कसा करायचा याबाबत

गोड्डा जिल्ह्यातील एका आदिवासी समाजाच्या व्यक्तीनं याबाबत बोलताना सांगितलं की, पावसाळ्यात घरामध्ये साप निघण्याच्या घटना वारंवार घडतात. अशा परिस्थितीमध्ये सर्पदंशाच्या घटनांमध्ये देखील वाढ होते. यापासून बचावासाठी आम्ही एक खास प्रकारचा तरल पदार्थ तयार करतो. हे लिक्विड घराच्या चारही बाजूला आणि जिथे अडचण आहे, अशा ठिकाणी फवारला तर घरात चुकूनही साप येत नाही, तसेच घरात जर साप असेल तर तो बाहेर निघून जातो, असा दावा या व्यक्तीनं केला आहे, दरम्यान हे लिक्विड नेमकं कसं बनावायचं याची माहिती देखील या व्यक्तीनं दिली आहे.

शेवग्याच्या झाडाच्या सालीपासून हे खास प्रकारचं लिक्विड तयार केलं जातं. सर्वात प्रथम शेवग्याच्या झाडाची साल काढली जाते, ती बारीक कुटली जाते. त्यानंतर बारीक कुटलेल्या या सालेला पाण्यात विरघळून एक मिश्रण तयार केलं जातं. या मिश्रणाला घराच्या खिडक्या, दरवाजे, आणि भितींच्या कोपऱ्यांमध्ये फवारलं जातं. याच्या तीव्र वासामुळे साप घरात येत नाही. तसेच घरात कुठे साप लपून बसला असेल तर तो देखील बाहेर निघून जातो असा, दावा या हे लिक्वीड ज्यांनी वापरलं त्यांच्याकडून करण्यात आला आहे.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)