AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधानांच्या बंगल्यामधील ते 3 टॉप सीक्रेट, कधीच नाही येत बाहेर, काय आहे रहस्य?

PM Residence Secret : भारताच्या पंतप्रधानांची सुरक्षा इतर राष्ट्राध्यक्षांप्रमाणेच अत्यंत चोख असते. पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू ते पीएम मोदीपर्यंत पंतप्रधानांच्या बंगल्यांमधील ते टॉप तीन सीक्रेट तुम्हाला माहिती आहे का? काय आहे ते रहस्य?

पंतप्रधानांच्या बंगल्यामधील ते 3 टॉप सीक्रेट, कधीच नाही येत बाहेर, काय आहे रहस्य?
पंतप्रधानांच्या बंगल्यामधील ते 3 टॉप सीक्रेट
| Updated on: Sep 25, 2026 | 2:36 PM
Share

 Prime Minister Residence: गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठा बदल झाला आहे. पहिले पंतप्रधान नेहरू यांचा बंगला हा ब्रिटिशकालीन होता. तर आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 7, लोक कल्याण मार्गसह हा परिसर कडेकोट बंदोबस्ताखाली असतो. आता अनेक तंत्रज्ञानाचा वापर होतो. केवळ सुरक्षा व्यवस्थाच नाही तर याशिवाय गुप्त प्रोटोकॉल आणि इतर अनेक टॉप सीक्रेट जे सामान्य माणसांच्या दृष्टीला कधीच पडत नाही. काय आहे ते टॉप तीन सीक्रेट?

नेहरूंचा गुप्त मार्ग

भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे तीन मूर्ती भवन येथे राहत. त्यांच्या या घराला बाहेर पडण्यासाठी ब्रिटिशकालीन गुप्त मार्ग होता. या मार्गाची माहिती केवळ हेरगिरी खात्यालाच होती. त्यातीलही केवळ वरिष्ठांनाच तो मार्ग माहिती होता. कोणत्याही अनाहूत संकटावेळी या मार्गाचा वापर करण्यात येत असे.

लाल बहादूर शास्त्री यांची गुप्त वॉर रूम

लाल बहादूर शास्त्री यांच्या कार्यकाळात खासकरून 1965 मधील भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान पंतप्रधान निवासस्थानी, 10 जनपथ इथे एक गुप्त वॉर रूम असल्याचा दावा करण्यात येतो. ही एक गुप्त संवाद खोली होती. आर्मी मुख्यालय ते या खोलीपर्यंत थेट संवाद होण्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली होती.

स्नायपरपासून सुरक्षा

खास निशाणेबाजापासून पंतप्रधानांची सुरक्षा व्हावी यासाठी इंदिरा गांधींच्या काळात खास कॉरिडोरची निर्मिती करण्यात आली होती. पंजाबमध्ये दहशतवादाने डोके वर काढले होते. या दरम्यान 1 सफदरजंग रस्त्यावरील पंतप्रधानांचे घर संवेदनशील ठिकाणांपैकी एक होते. त्याच्या सुरक्षेसाठी विविध कार्यालयात जाण्यासाठी एक कॉरिडोर तयार करण्यात आला होता.

राजीव गांधी ते मनमोहन सिंहापर्यंत

1984 मध्ये इंदिरा गांधी यांची हत्या झाली. त्यांतर लागलीच एक स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप तयार करण्यात आला. पंतप्रधानांच्या सुरक्षेत मोठा बदल करण्यात आला. राजीव गांधी यांच्या कार्यकाळात डिकॉय कॉन्वॉय सुरू करण्यात आली. त्यात सारख्या दिसणार्‍या वाहनांचा काफिला सोबत चालायचा. यामुळे कोणत्या कारमध्ये पंतप्रधाना आहेत, हे कळायचे नाही. मनमोहन सिंग यांच्या काळात इलेक्ट्रॉनिक सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली.

मोदींच्या काळात मोठा बदल

आज 7 लोक कल्याण मार्गावरील पंतप्रधानांचे निवासस्थान 12 एकरवर आहे. त्यात पाच बंगले आहेत. त्यात एक भूमिगत, भुयारी सीबीआरएन सुरक्षित बंगला आहे. हे ठिकाण रासायनिक, जैविक अथवा अणवस्त्र हल्ल्यातही टिकून राहते. त्यावर रेडिओलॉजिकल धोका शून्य होतो. येथील बंगला क्रमांक एकवर हेलीपॅड सुद्धा आहे.

Follow Us
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत
धान्य, फळं अन्… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने....
Pune Ganpati Visarjan : धान्य, फळं अन् उसाची शेती… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने वेधलं पुणेकरांचं लक्ष
ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
Lalbaugcha Raja : बाप्पाला निरोप देण्यासाठी कोळी बांधवांचा जल्लोष! पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ..
Mumbaicha Raja Visarjan : मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ व्हायरल
ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत...
Ganpati Visarjan 2026 : ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत मुंबईकरांची मानवंदना
ढोल-ताशांचा निनाद अन्... पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं ड्रोन दृश्य
Pune Ganpati Visarjan : ढोल-ताशांचा निनाद, गुलालाची उधळण अन्... पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं ड्रोन दृश्य पाहून डोळेच दिपतील