AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या नेत्याने 284 वेळा लढवली निवडणूक, पण प्रत्येकवेळी नशीबाने फिरवली पाठ

Bhagalpur Nagarmal Bajoria: नगरसेवकापासून ते राष्ट्रपती पदापर्यंत नागरमल बाजोरिया यांनी एकही निवडणूक सोडली नाही. पण नशीबाने कधीच त्यांना साथ दिली नाही. 284 वेळा त्यांनी निवडणूक लढवली. पण पराभवाशिवाय त्यांच्या पदरात काहीच पडले नाही. त्यांनीही कधीच हार पत्करली नाही. ते निवडणूक लढवतच राहिले.

या नेत्याने 284 वेळा लढवली निवडणूक, पण प्रत्येकवेळी नशीबाने फिरवली पाठ
नागरमल बाजोरिया
| Updated on: Sep 25, 2026 | 1:55 PM
Share

सत्ता प्राप्तीसाठी निवडणूक लढवावी लागते. निवडणूक जिंकण्यासाठी घरावरही अनेकांनी तुळशीपत्र ठेवले आहे. काही नेत्यांचा राजकीय प्रवास निवडणुकींनी कायमचा बंद केला तर काहींना राजकारणात उपेक्षा सहन करावी लागली. प्रत्येक नेत्याच्या वेगवेगळ्या व्यथा आहेत. पण बिहारमधील भागलपूर येथील नागरमल बाजेरिया उर्फ धरती पकड यांना यशानं प्रत्येक वेळी हुलकावणी दिली. पण त्यांनी प्रयत्न सोडले नाही. एक, दोन, दहा, वीस नव्हे तर 284 वेळा त्यांनी निवडणूक लढवली. पण प्रत्येकवेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. पण त्यांनी निवडणूक लढवणे थांबवले नाही. 3 सप्टेंबर 2026 रोजी पाटणा येथे त्यांचे 96 व्या वर्षी निधन झाले. पण त्यांचा निवडणूक लढवण्याचा रेकॉर्ड कायम आहे.

ग्राम पंचायत ते राष्ट्रपतींची निवडणूक

नागरमल बाजेरिया यांचा निवडणुकीचा प्रवास एका निवडणुकीपुरता मर्यादित नाही. त्यांनी ग्रामपंचायतपासून ते नगरपालिका, विधानसभा, लोकसभा आणि राष्ट्रपती पदाची निवडणूकही लढवली आहे. त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नशीब आजमावून पाहिले आहे. 1969 मध्ये त्यांनी राष्ट्रपतीच्या निवडणुकीत तत्कालीन उमेदवार व्ही. व्ही. गिरी यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्याकाळी असे धाडस करणे सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर होते.

अनेक दिग्गजांविरोधात उमेदवारी अर्ज

बाजोरिया यांनी देशातील अनेक दिग्गज नेत्यांविरोधात निवडणूक लढवली आहे. त्यांनी रायबरेलीतून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. अमेठीत राजीव गांधी यांच्याविरोधात ते मैदानात उतरले होते. संजय गांधी, अटल बिहारी वाजपेयी आणि एल. के. अडवाणी सारख्या दिग्गज नेत्यांनाविरोधात त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण प्रत्येकवेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. पण त्यांची हिंमत कधीच कमी झाली नाही.

धरती पकड हे नाव पडलं कसं?

विविध निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागत होता. त्यामुळे भागलपूरमध्ये त्यांना धरती पकड असे संबोधले जाऊ लागले. त्यांच्या कुटुंबियांच्या मते, निवडणुकीतील जय-पराजय हा त्यांचा पिंडच नव्हता. लोकशाहीत सामान्य माणसानं निवडणूक लढवून पाहावी. तो केवळ मतदार राहू नये असे त्यांचे धोरण होते. राजकीय घराणेशाहीला त्यांचा विरोध होता. त्यांनी जिंकण्यासाठी कधी निवडणूक लढवली नाही. सामान्य माणूस सुद्धा निवडणूक लढवू शकतो. हा घटनेने त्याला दिलेला अधिकार आहे, हाच संदेश त्यांनी या निवडणुकांमधून दिल्याचे त्यांचे कुटुंबिय मानतात.

Follow Us
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत
धान्य, फळं अन्… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने....
Pune Ganpati Visarjan : धान्य, फळं अन् उसाची शेती… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने वेधलं पुणेकरांचं लक्ष
ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
Lalbaugcha Raja : बाप्पाला निरोप देण्यासाठी कोळी बांधवांचा जल्लोष! पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ..
Mumbaicha Raja Visarjan : मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ व्हायरल
ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत...
Ganpati Visarjan 2026 : ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत मुंबईकरांची मानवंदना
ढोल-ताशांचा निनाद अन्... पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं ड्रोन दृश्य
Pune Ganpati Visarjan : ढोल-ताशांचा निनाद, गुलालाची उधळण अन्... पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं ड्रोन दृश्य पाहून डोळेच दिपतील
लालबागच्या राजाची मंडपातील शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू
Lalbaugcha Raja Aarti : लालबागच्या राजाची मंडपातील शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! जयघोषाने दुमदुमली मुंबई...
Ganpati Visarjan 2026 : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! जयघोषाने दुमदुमली मुंबई; भाविकांचा निरोपाचा भावूक क्षण