
देशातील पहिली वंदेभारत स्लिपर कोच ट्रेन शनिवारी 17 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाँच होणार आहे. या ट्रेनमुळे भारतीय रेल्वेतील आरामदायी प्रवासाचा प्रवाशांचा अनुभव संपूर्णपणे बदलणार आहे. या ट्रेनमध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे RAC (Reservation Against Cancellation)ची सुविधा मिळणार नाही. यात केवळ कन्फर्म तिकीटधारी प्रवाशांनाच प्रवास करता येणार आहे. यात कोणतीही वेटिंग लिस्ट किंवा अंशत: कन्फर्म सीट असणार नसल्याने वेटिंग तिकीटाच्या आधारे प्रवास करणाऱ्यांचा हिरमोड होणार आहे.
रेल्वे बोर्डाने 9 जानेवारी रोजी एक परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार वंदे भारत स्लिपर ट्रेनमध्ये एडव्हान्स रिझर्व्हेश पिरीयड (ARP) च्या पहिल्या दिवसापासूनच सर्व उपलब्ध बर्थ बुकींगसाठी उघडले जातील. या ट्रेनमध्ये RAC,वेटिंग वा अंशत: कन्फर्म तिकीटांची कोणतीही व्यवस्था असणार नाही. सर्वसाधारणपणे अन्य ट्रेनमध्ये RAC अंतर्गत दोन प्रवाशांना एक साईड लोअर बर्थ शेअर करता येते. परंतू या वंदेभारत स्लिपर ट्रेनमध्ये अशी कोणतीही आरएसी सिस्टीम नसणार हे रेल्वेने स्पष्ट केले आहे.
वंदे भारत स्लिपर ट्रेनचे भाडे सध्या प्रिमीयम ट्रेन उदा. राजधानी एक्सप्रेसपेक्षा जास्त असणार आहे. प्रवाशांना किमान 400 किलोमीटरचे भाडे द्यावेत लागणार आहे.मग भले त्यांना त्याहून कमी अंतराचा प्रवास करायचा असेल असेही रेल्वेच्या परिपत्रकात म्हटले आहे.
3AC चे भाडे : ₹2.40 प्रति किमी
2AC चे भाडे: ₹3.10 प्रति किमी
1AC चे भाडे: ₹3.80 प्रति किमी (यावर GST स्वतंत्रपणे असेल )
1 ते 400 किमी (न्यूनतम भाडे )
3AC: ₹960
2AC: ₹1,240
1AC: ₹1,520
1000 किमी (हावडा–गुवाहाटी मार्ग )
3AC: ₹2,400
2AC: ₹3,100
1AC: ₹3,800
2000 किमी
3AC: ₹4,800
2AC: ₹6,200
1AC: ₹7,600
तुलना करायची गेली तर राजधानी एक्सप्रेसचे प्रति किलोमीटर भाडे वंदेभारत स्लिपर ट्रेनपेक्षा थोडे कमी आहे. परंतू वंदेभारत स्लिपर एक्सप्रेसमध्ये लक्झरी सुविधा जास्त असून अधिक आरामदायी प्रवास आणि कमी वेळात प्रवासाचे अंतर कापता येणार आहे.
देशाची पहिली वंदे भारत स्लिपर ट्रेन हावडा–गुवाहाटी मार्गावर धावणार आहे. या पहिल्या वंदेभारत एक्सप्रेसचे उद्घाटन शनिवार 17 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत.ही ट्रेन रात्रीच्या प्रवासासाठी असून सकाळी मुक्कामी पोहचणार आहे.
ही ट्रेन पश्चिम बंगालच्या सात जिल्हे हावडा, हुगळी, पूर्व बर्दवान, मुर्शिदाबाद, मालदा, जलपाईगुडी आणि कूचबिहार आणि आसामच्या कामरुप पेट्रोपॉलिटन आणि बोंगाईगांव अशा एकूण 10 स्थानकांवर ही ट्रेन थांबणार आहे.
ट्रेनमध्ये एकूण 16 कोच ( डबे ) असणार आहेत.
11 कोच : 3AC
4 कोच : 2AC
1 कोच : 1AC
ही ट्रेन दरताशी 180 किमी तास वेगासाठी तायर केली आहे. परंतू रेल्वे ट्रॅकची क्षमता आणि स्थानकांची संख्येनुसार ही ट्रेन सध्या 130 किमी वेगाने चालवण्यात येणार आहे. सध्या राजधानी एक्सप्रेसचा वेग दरताशी 80-90 किमी इतका आहे.
वंदे भारत स्लीपरला खास करुन आराम आणि सुरक्षेला ध्यानात ठेवून तयार करण्यात आली आहे. यातील आसने चांगली गादी असलेले आरामदायी आहेत. ऑटोमेटिक दरवाजे, कमी आवाज होणारा सस्पेंशन सिस्टीम, आधुनिक ड्रायव्हर कॅब, एअरोडायनामिक डिझाईन यात आहे. ट्रेन टक्कर टाळण्यासाठी टक्कर विरोधी यंत्रणा कवच लावण्यात आले आहे.यात ड्रायव्हरशी संपर्क करण्यासाठी इमरजन्सी टॉक-बॅक सिस्टम आणि उच्च दर्जाची सॅनिटेशनसाठी डिसइन्फेक्टेन्ट टेक्नोलॉजी उपलब्ध आहे.