एक, दोन नव्हे तर 16 मुले जन्माला घाला…या बड्या राजकीय नेत्याचा सल्ला

Tamil Nadu cm Muthuvel Karunanidhi Stalin Advice: पूर्वी नवविवाहित दाम्पत्यांना 16 प्रकारची संपत्ती मिळवण्यासाठी आशीर्वाद दिला जात होता. परंतु आता 16 पद्धतीची संपत्ती मिळण्याचा आशीर्वादाऐवजी 16 मुले जन्माला घालण्याचा आशीर्वाद देण्याची वेळ आली आहे.

एक, दोन नव्हे तर 16 मुले जन्माला घाला...या बड्या राजकीय नेत्याचा सल्ला
born child
| Updated on: Oct 21, 2024 | 12:45 PM

New Population Policy Rules: जगात लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकून भारत पहिल्या क्रमांकावर पोहचला आहे. देशातील लोकसंख्येवर नियंत्रण करण्यासाठी कधीकाळी त्यासाठी लोकसंख्या नियंत्रण धोरण तयार केले होते. परंतु आता भारतात चीन, जपान प्रमाणे वृद्धांची वाढत आहे. यामुळे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी नवीन लोकसंख्या नियंत्रण धोरण आणणार असल्याचे म्हटले आहे. त्यात अधिक मुले जन्माला घालण्यास प्रोत्साहन दिले जाणार आहे. तसेच दोन पेक्षा जास्त मुले असलेल्या लोकांना निवडणूक लढवता येणार आहे. आता चंद्रबाबू नायडू यांच्यानंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी जास्त मुले जन्माला घालण्याचे आव्हान केले आहे. नवविवाहित दाम्पत्याने 16 मुले जन्माला घालावे, असे त्यांनी म्हटले आहे.

16 मुले जन्माला घालण्याची वेळ आली…

चेन्नईमध्ये हिंदू धार्मिक संस्थेद्वारे आयोजित कार्यक्रमात बोलताना स्टॅलिन यांनी हे विधान केले. त्या ठिकाणी मुख्यमंत्री एम.के. स्टलिन यांच्या उपस्थितीत 31 दाम्पत्याचा विवाह झाला. ते म्हणाले आता दाम्पत्यांनी 16 मुले जन्माला घालण्याची वेळ आली आहे. सीएम एम.के. स्टॅलिन यांनी मानव संसाधन आणि सामाजिक न्याय मंत्री शेखर बाबू यांचे भरभरून कौतुक केले.

मंदिरांची देखभाल आणि संसाधने सुलभ करण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केल्याचे स्टॅलिन यांनी म्हटले. ते म्हणाले, भक्तीचा मुखवटा म्हणून वापर करणारे नाराज आहेत. द्रमुक सरकारचे यश रोखण्यासाठी खटले दाखल करत आहेत. कलैगनर यांनी फार पूर्वी पराशक्ती या चित्रपटात एक संवाद लिहिला होता, ज्यात त्यांनी म्हटले होते की, ‘आम्ही मंदिरांच्या विरोधात नाही, तर मंदिरे भयंकर माणसांसाठी छावण्या बनण्याच्या विरोधात आहोत.’

ही होती 16 संपत्ती

स्टॅलिन म्हणाले, पूर्वी नवविवाहित दाम्पत्यांना 16 प्रकारची संपत्ती मिळवण्यासाठी आशीर्वाद दिला जात होता. परंतु आता 16 पद्धतीची संपत्ती मिळण्याचा आशीर्वादाऐवजी 16 मुले जन्माला घालण्याचा आशीर्वाद देण्याची वेळ आली आहे. पूर्वी सांगण्यात येणारी 16 संपत्ती म्हणजे गाय, घर, पत्नी, संतान, शिक्षा, जिज्ञासा, ज्ञान, अनुशासन, भूमी, जल, आयु, वाहन, सोना, संपत्ती, धान्य आणि प्रशंसा होती. परंतु आता संतान प्राप्त होण्याचा आशीर्वाद दिला जावा.