AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mamta Banerjee : ममता बॅनर्जींना पुन्हा धक्का? TMC खासदाराचा नड्डांसोबत फोटो, राजकीय चर्चांना उधाण

संसदेच्या कँटीनमध्ये टीएमसी नेते सौगत रॉय आणि शत्रुघ्न सिन्हा अमित शाह व जे. पी. नड्डांसोबत दिसल्याने पश्चिम बंगालच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. ममता बॅनर्जींना आणखी एक धक्का बसू शकतो, अशी चर्चा सुरू झाली. नेत्यांनी राजकीय चर्चा नाकारली असली तरी, काही टीएमसी सदस्यांनी याला 'डबल ट्रॅक' रणनीती म्हटले आहे.

Mamta Banerjee : ममता बॅनर्जींना पुन्हा धक्का? TMC खासदाराचा नड्डांसोबत फोटो, राजकीय चर्चांना उधाण
ममता बॅनर्जी यांना पुन्हा बसणार धक्का ?
| Updated on: Jul 31, 2026 | 9:56 AM
Share

पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आणखी एक राजकीय धक्का बसू शकतो, अशी चर्चा सुरू झाली आहे. तृणमूल काँग्रेस (TMC)चे वरिष्ठ खासदार सौगत रॉय आणि शत्रुघ्न सिन्हा यांचा संसदेच्या कँटीनमधील एक फोटो समोर आल्यानंतर पश्चिम बंगालच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. या फोटोमध्ये दोन्ही नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासोबत एका टेबलावर दिसत असल्याने त्यांच्या भाजप (BJP) प्रवेशाच्या अटकळींना उधाण आलं आहे. त्यामुळे ममता यांना आणखी एक मोठा झटका बसणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. या फोटोबाबत विचारले असता शत्रुघ्न सिन्हा यांनी नड्डा हे आपले जुने मित्र असल्याचे सांगितले. तर सौगत रॉय यांनीही स्पष्टीकरण देत कोणत्याही पक्षांतराची शक्यता फेटाळून लावली आहे.

कँटीनमध्ये अमित शाह किंवा जे. पी. नड्डा यांच्याशी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असं संसद भवनाबाहेर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले. “आम्ही आधीपासून त्या टेबलावर बसलो होतो. अमित शाह आणि भाजपचे आणखी एक नेते काही वेळासाठी तिथे आले आणि नंतर निघून गेले. आमच्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही,” असं रॉय यांनी स्पष्ट केलं. आमच्यात कोणतीही चर्चा झाली नाही. उलट भाजपचे लोक आमच्याशी संपर्क साधत आहेत. आम्ही तर एनडीएमध्ये गेलेल्या लोकांना पुन्हा परत येण्याचे आवाहन करत आहोत.” असंही त्यांनी नमूद केलं.

नड्डा माझे जुने मित्र

द टेलिग्राफ इंडियाच्या वृत्तानुसार, माजी भाजप नेते आणि सध्याचे टीएमसी खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. या भेटीचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. नड्डा हे त्यांचे जुने मित्र असल्यामुळे ते त्यांच्यासोबत बसले होते, असंही सिन्हा यांनी सांगितलं.

काकोली घोष यांचा तिखट हल्ला

मात्र, संसद किंवा विधानसभेत सामाजिक भेटीदरम्यान अशा प्रकारचे फोटो काढले जाणे ही सामान्य बाब आहे आणि त्यातून कोणताही राजकीय अर्थ काढू नये, असं श्रीरामपूरचे खासदार कल्याण बॅनर्जी आणि बेलेघाटाचे आमदार कुणाल घोष यांनी म्हटलं. “अशा अफवांना काही अंत नाही. याचा आमच्या विचारसरणीशी किंवा राजकारणाशी काहीही संबंध नाही.” असं त्यांनी स्पष्ट केलं. मात्र, तृणमूल काँग्रेसच्या खासदार काकोली घोष दस्तीदार यांनी या वादात अधिक भर घालत सौगत रॉय यांचे हे जेवण एखाद्या आखीव-रेखीव ‘डबल ट्रॅक’ रणनीतीचा भाग असू शकते, असा संकेत दिला. “मी ते फोटो बारकाईने पाहिलेत. कदाचित ते काही योजना आखत असतील. आमचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. ते थेट चर्चा करत आहेत. राजकारणात असचं घडत असते. ही एक प्रकारची ‘डबल ट्रॅक’ रणनीती आहे” असं घोष म्हणाल्या.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा