
काही अशा योजना असतात ज्यावर आपला विश्वास बसत नाही, आता अशीच एक योजना समोर आली आहे, ज्या योजनेअंतर्गत तुम्हाला एका खेडे गावात राहण्यासाठी सरकार तब्बल 40 लाख रुपये देणार आहे. मात्र त्यासाठी एक अट देखील आहे, ही अट जो पूर्ण करेल त्यालाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.स्वित्झर्लंडमध्ये असं एक गाव आहे, जिथे राहण्यासाठी सरकार तुम्हाला पैसे देणार आहे. या गावात राहण्यासाठी प्रोत्साहन मिळावं यासाठी सरकार एक -दोन लाख रुपये नाही तर तब्बल 40 लाख रुपये देणार आहे. हे ऐकूण तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल पण ही गोष्ट खरी आहे. ज्या लोकांना स्वित्झर्लंडमध्ये स्थायिक व्हायचं आहे, त्या लोकांसाठी आता तेथील सरकारने एक खास योजना तयार केली आहे. ज्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत नाही, मात्र त्यांना स्वित्झर्लंडमध्ये स्थायिक व्हायचं आहे, अशा लोकांसाठी ही योजना म्हणजे एक चांगली संधी आहे. मात्र त्यासाठी येथील सरकारची एक अट आहे, जो व्यक्ती ही अट पूर्ण करेल त्यालाच हे पैसे मिळणार आहेत.
काय करावं लागेल?
ज्या लोकांना स्वित्झर्लंडमध्ये स्थायिक व्हायचं अशा लोकांसाठी ही योजना खूप फायद्याची ठरू शकते. स्वित्झर्लंडमध्ये एक गाव आहे, तिथे स्थायिक होण्यासाठी सरकारकडून चाळीस लाख रुपये दिले जातात, एवढंच नाही तर तुम्ही जर तिथे मुल जन्माला घातलं तर तुम्हाला आणखी पैसे या सरकारकडून मिळतात. तेथील सरकारने ही स्कीम यासाठी सुरू केली कारण स्वित्झर्लंडमध्ये लोकसंख्या झपाट्यानं कमी होत आहे. ज्या गावासाठी ही स्कीम सुरू करण्यात आली आहे, त्या गावात तर फारच थोडी लोकसंख्या आहे, त्यामुळे या गावाची लोकसंख्या वाढावी यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे. अल्बेनियन नावाचं हे गाव आहे, ज्या गावासाठी स्वित्झर्लंड सरकारने ही योजना सुरू केली आहे. 2018 मध्ये स्वित्झर्लंड सरकारने या योजनेला सुरुवात केली आहे.
या योजनेनुसार तु्म्ही जर चार व्यक्तीच्या कुटुंबासह या गावात राहण्यासाठी जाणार असाल तर तेथील सरकार तुम्हाला प्रति व्यक्ती 22 लाख रुपये एवढी रक्कम देणार आहे, जर तुमच्याकडे पाच वर्षांपेक्षा कमी वयाचे मुलं असतील तर प्रत्येक मुलाला या ठिकाणी राहण्यासाठी 8 लाख रुपये अतिरिक्त मिळणार आहेत. जर तुम्ही कपल आहेत, आणि दोघेच असाल तर या गावात राहण्यासाठी सरकार तुम्हाला 40 लाख रुपये देणार आहे. तसेच तुम्हाला जर या काळात एखादं मुलं झालं तर त्याचा सगळा खर्च येथील सरकार करणार आहे, आणि त्यासाठी तुम्हाला अतिरिक्त पैसे देखील मिळणार आहेत. मात्र त्यासाठी अट एकच आहे, तुम्ही जर या गावात राहण्यासाठी गेलात तर पुढचे दहा वर्ष तुम्हाला हे गाव सोडता येणार नाहीये, ही अट मान्य असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे, तुम्ही जर करार मोडला तर सरकारकडून तुम्ही जेवढे पैसे घेतले आहेत, ते सर्व पैसे तुम्हाला परत करावे लागणार आहेत. अल्बेनियन गावाच्या ऑफिशयल वेबसाईटवर जाऊन तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकतात.