
Shivam Mishra Lamborghini Car Accident : उत्तर प्रदेशातील कानपूर येथे एक धाक्कादायक घटना घडली आहे. दिग्गज तंबाखू व्यापारी केके मिश्रा यांच्या मुलाने रस्त्यावरील सहा जाणांना चिरडले आहे. केके मिश्रा यांच्या मुलाचे नाव शिवम मिश्रा असून तो अत्यंत महागड्या आणि आलिशान असा लँम्बोर्गिनी कारमधून जात होता. अतिशय वेगाने तो कार चालवत होता, असे सांगितले जात आहे. भरधाव वेगात कारमधून जात असतानाच त्याने सहा जणांना चिरडले आहे. जखमींवर उपचार केले जात असून या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. रविवारी दुपारी ही घटना घडली असून पोलिसांनी शिवम मिश्रा याची लँम्बोर्गिनी कार जप्त केली आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार दिग्गज आणि प्रसिद्ध तंबाखू व्यापारी केके मिश्रा यांचा मुलगा शिवम मिश्रा हा रविवारी दुपारी 3 वाजून 15 मिनिटांनी कानपूरमधील ग्वालटोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेव-3 या भागातून जात होता. काळ्या रंगाच्या लँम्बोर्गिनी कारमधून तो प्रवास करत होता. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार तो अत्यंत वेगात ही कार चालवत होता. त्याच वेळी शिवम मिश्राचे कारवरील नियंत्रण सुटले. यात एकूण सहा लोक चिरडले गेले. हा अपघात एवढा भिषण होता की लँम्बोर्गिनी कारने धडक दिल्याने बुलेटवरून प्रवास करणारा एक प्रवासी आपल्या बाईकसह दूर जाऊन कोसळला. शिवम मिश्रा याची लँम्बोर्गिनी कार नंतर त्या बुलेटवरूनही गेली.
या घटनेनंतर तेथील लोक चांगलेच भडकले. शिवम मिश्राला लोकांनी घेरले होते. परंतु पोलिसांनी त्याला लोकांच्या तावडीतून कसेबसे सोडवले. सोनू त्रिपाठी, विशाल, तौफीक असे या अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार जखमी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. परंतु तेथे शिवम मिश्रा याच्या बाऊन्सरने पीडित लोकांवर जबाव टाकण्याचा प्रयत्न केला. सध्या पोलिसांनी शिवम मिश्रा तसेच त्याची लँम्बोर्गिनी ताब्यात घेली आहे. शिवम मिश्रा याची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे.
शिवम मिश्रा हा केके मिश्रा यांचा मुलगा आहे. केके मिश्रा हे कानपूरमधील प्रसिद्ध तंबाखू व्यापारी आहेत. मार्च 2024 मध्ये केके मिश्रा यांच्याशी संबंधित ठिकाणांवर आयटी विभागाने छापेमारी केली होती. या छापेमारीत 150 कोटींचा कर बुडवल्याचे समोर आले होते. तसेच 12 कोटी रुपयांच्या घड्या, 7 कोटी रुपयांचे दागिने, 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमत असलेल्या कार आढळून आल्या होत्या. दिल्लीमध्ये केक मिश्रा यांच्याशी संबंधित एक 16 कोटी रुपयांच रोल्स रॉयस ही आलिशान कार आयटी विभागाला मिळाली होती.