LIVE : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

LIVE : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी
Picture

दादर पोलीस वसाहतीतील सिलेंडर स्फोटात 10 वर्षीय मुलीचा मृत्यू

दादरच्या पोलीस वसाहतीच्या इमारतीत सिलेंडर स्फोटामुळे 10 वर्षीय मुलीचा मृत्यू, तर 15 वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर हा स्फोट झाला आहे. स्फोटात तीन घरांचं नुकसान झालं असून अग्नीशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

12/05/2019,3:07PM
Picture

मुंबई-गोवा मार्गावर भीषण अपघात, एकजण ठार

रत्नागिरी येथील मुंबई-गोवा मार्गावरील आवशी येथे ट्रक आणि जीपचा अपघात झाला. या अपघातात जीप आणि ट्रक एकमेकांवर आदळल्याने भीषण अपघात झाला. अपघातात जीप चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातामुळे काहीकाळ वाहतूक ठप्प

12/05/2019,11:50AM
Picture

बारामती शहरातील महालक्ष्मी इलेक्ट्रॉनिक मॉलला आग

बारामती शहरातील महालक्ष्मी इलेक्ट्रॉनिक मॉलला आग लागली आहे. या आगीत संपूर्ण मॉल भस्मसात झाला आहे. सुदैवाने या आगीत कुणी जखमी झालेले नाही. अग्नीशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरु आहे

12/05/2019,10:57AM
Picture

कोल्हापूर-तिरुपती विमानसेवा आजपासून सुरु

कोल्हापूर-तिरुपती विमानसेवा आजपासून सुरु करण्यात आली आहे. भाविकांची अनेक दिवसांची प्रतीक्षा अखेर आज पूर्ण झाली. आता दररोज कोल्हापुरातून तिरुपतीला विमानाने जाता येणार आहे. सकाळी 9.45 वाजता कोल्हापुरातून टेक ऑफ होईल.

12/05/2019,10:41AM
Picture

पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के

पालघरमध्ये पुन्हा डहाणू, तलासरी भागात भूकंपाचे धक्के, वारंवार हेणाऱ्या भूकंपाच्या धक्क्याने गावातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण, 7:40, 7: 44 त्यानंतर 7: 53 वाजता जोरदार व सौम्य भूकंपाचे धक्के, पालघरमध्ये भूकंपाचे सत्र सुरूच

12/05/2019,8:02AM
Picture

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात, सात राज्यांमधील 59 जागांवर मतदान, या टप्प्यात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

12/05/2019,7:45AM
Picture

पुणे : सासरच्या छळाला कंटाळून डॉक्टर महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

पिंपरी चिंचवड शहरातील धक्कादायक घटना, महिलेवर खासगी रूग्णालयात उपचार सुरु, पतीसह सासू-सासऱ्यांवर गुन्हा दाखल

12/05/2019,7:40AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *