
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय देशाच्या 25 नॅशनल हायवेवरुन टोल प्लाझा समाप्त करण्याची योजना आखत आहे. त्यामुळे ट्रॅफीक जाममधून सुटका होऊन टोल प्लाझावरील कोंडी टळणार असल्याने वाहनांचा मुक्त प्रवास सुरु होणार आहे. यासाठीच मल्टीलेन फ्री टोलची प्रणाली सुरु करण्याची योजना आखण्यात आली आहे. MLFF योजनेचा मुख्य हेतू टोल महसुलीत सुधारणा आणि देशभरात स्मार्ट गती आणि अधिक कुशल हायवे नेटवर्क उपलब्ध करणे हा आहे.
मल्टी – लेन फ्री फ्लो टोलिंग एक विना व्यत्यय टोलिंग प्रणाली आहे. ही उच्च दर्शन आरएफआयडी रिडर्स आणि एएनपीआर कॅमेऱ्यांद्वारा फास्टॅग आणि वाहन नोंदणी संख्येला ( व्हीआरएन ) मोजून देवाण-घेवाण सक्षम बनवते. एकदा ही योजना लागू झाल्यानंतर मल्टी-लेन फ्री फ्लो प्रणाली टोल प्लाझावर वाहनांना न थांबवता विना व्यत्यय टोल संग्रह प्रदान करण्यात येणार आहे.
सरकारने या प्लान संदर्भात सांगितले की या योजनेमुळे गर्दीं आणि प्रवासाचा वेळ कमी करणार आहे. ज्यामुळे इंधन दक्षतेत वृद्धी होणार आणि प्रदुषणात कमी होणार आहे.केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एका प्रेस रिलीजमध्ये सांगितले की एनएचएआय चालू आर्थिक वर्षांत सुमारे 25 राष्ट्रीय महामार्गावर टोल प्लाझावर एमएलएफएफ आधारित टोल व्यवस्था सुरु करण्याची योजना आखत आहे. ही योजना कार्यान्वित करण्यासाठी अशा टोल प्लाझाची निवड करण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये 25 राष्ट्रीय महामार्गांवर टोल प्लाझावर एमएलएफएफ आधारित टोल व्यवस्था सुरु करण्याची योजना आखत आहे.केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात एनएचएआय येत्या आर्थिक वर्षात सुमारे 25 राष्ट्रीय महामार्ग टोल प्लाझावर एमएलएफएफ आधारित टोल प्रणाली लागू करणार आहे.
गुरजरातच्या चोर्यासी टोल प्लाझा देशातील पहिला बॅरियर मुक्त टोल प्लाझा बनण्यासाठी तयार आहे. यासाठी भारतीय महामार्ग व्यवस्थापन कंपनी लिमिटेड (IHMCL) आणि ICICI बँकेदरम्यान देशातील पहिली व्यापक मल्टी-लेन फ्री फ्लो (MLFF) टोल प्रणाली लागू करण्यासाठी एक करारावर सह्या करण्यात आल्या आहेत.
सध्या देशात एकूण 63 लाख किलोमीटहून अधिक लांबीचे रस्ते नेटवर्क आहे. यातील राष्ट्रीय महामार्ग ( एनएच ) एकूण लांबी 1,46,342 आहे. ही लांबी मार्च 2014 च्या 91,287 किलोमीटर जाळ्यापेक्षा खूपच जास्त आहे. म्हणजे एका दशकात देशातील राष्ट्रीय महामार्गांच्या नेटवर्क मध्ये 55,055 किलोमीटरची वाढ झाली आहे.