बापरे! तब्बल 7000 विद्यार्थी HIV पॉझिटिव्ह, धक्कादायक रिपोर्टने एकच खळबळ

18 ते 25 वर्षे वयोगट असणाऱ्या एकूण 7000 विद्यार्थ्यांना एचआयव्हीची लागण झाल्याचे समोर आले आहे. ही आकडेवारी समोर आल्यानंतर आता कर्नाटक सरकराने राज्य पातळीवर एक नवी मोहीम उघडली आहे.

बापरे! तब्बल 7000 विद्यार्थी HIV पॉझिटिव्ह, धक्कादायक रिपोर्टने एकच खळबळ
karnataka hiv positive student
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 29, 2026 | 3:22 PM

Karnataka College Students HIV Positive : देशात एचआयव्ही आणि एड्स संदर्भात सरकारकडून जनजागृती केली जाते. एड्स हा आजार संसर्गजन्य नसला तरीही तो आजार एकदा जडला की त्याला समूळ नष्ट करता येत नाही. म्हणूनच या आजारापासून दूर राहायचे असेल तर प्रतिबंधात्मक उपाय हाच सर्वोत्तम पर्याय असल्याचे बोलले जाते. एड्सला थोपवण्यासाठी सरकारी पातळीवर अनेक उपक्रम राबवले जात असले तरीही त्याचे समूळ उच्चाटून अद्याप होऊ शकलेले नाही. असे असतानाच हदारवणारी माहिती समोर आली आहे. कर्नाटकमध्ये तब्बल 7000 तरुण विद्यार्थ्यांना एचआयव्हीची लागण झाल्याचे समोर आले आहेत. ही आकडेवारी समोर आल्यानतंर आता प्रशासन खडबडून जागे झाले आहे.

नेमकी काय माहिती समोर आली?

मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटकमध्ये 18 ते 25 वर्षे वयोगट असणाऱ्या एकूण 7000 विद्यार्थ्यांना एचआयव्हीची लागण झाल्याचे समोर आले आहे. ही आकडेवारी समोर आल्यानंतर आता कर्नाटक सरकराने राज्य पातळीवर एक नवी मोहीम उघडली आहे. उच्च शिक्षण देणाऱ्या सर्वच शैक्षणिक संस्थांमध्ये आता एचआयव्हीची चाचणी आणि समुपदेशन अनिवार्य करण्यात आले आहे. द हिंदू या वृत्तपत्रानुसार कर्नाटक राज्य एड्स प्रतिबंधक संस्थेने (केएसएपीएस) दिलेल्या सल्ल्यानुसार कर्नाटक राज्याने हा निर्णय घेतला आहे. आता कर्नाटकात सर्वच शासकीय, निमशासकीय तसेच खासगी कॉलेजमध्ये कॅम्प घेतले जाणार आहेत.

आकडेवारी काय सांगते?

समोर आलेल्या माहितीनुसार कर्नाटकमधील 6 कोटी 11 लाख लोकसंख्येमध्ये एकूण 2 लाख 60 हजार लोक एचआयव्ही बाधित असल्याचे समोर आले आहे. यातील लाख 5 हजार लोकांवर उपचार सुरू आहेत. तर 54 हजार लोकांना आपण एचआयव्ही पॉझिटीव्ह आहोत, याबाबत कल्पनाच नाही. कर्नाटकमध्ये 18 ते 35 वयोगट असलेल्या तरुणांमध्ये एचआयव्ही संसर्गाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. 2023-24 या वर्षात एचआयव्ही रुग्णांची संख्या 44 हजार 500 होती. हीच संख्या कर्नाटकात 2025-26 मध्ये 66 हजार 600 एवढी वाढली आहे. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे 18 ते 25 वर्षे वयोगट असलेले 7 हजार महाविद्यालयीन विद्यार्थी हे एचआयव्ही बाधित आहेत. दरम्यान, हा रिपोर्ट समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us