
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, आणि सबका प्रयास” या मंत्राला अनुसरून तसेच ‘जनजातीय गौरव’ आणि ‘व्होकल फॉर लोकल’ या संकल्पांना केंद्रस्थानी ठेवून ‘ट्रायबल बिझनस कॉनक्लेव्ह 2025’ चे नवी दिल्लीत आयोजन होत आहे.
17 ऑक्टोबर 2025 रोजी झालेल्या ‘राष्ट्रीय अधी कर्मयोगी अभियान परिषदेत’ आदिवासी व्यवहार मंत्रालयाने, सांस्कृतिक मंत्रालय आणि वाणिज्य तसेच उद्योग संवर्धन विभाग (DPIIT) यांच्या सहकार्याने ‘ट्रायबल बिझनस कॉनक्लेव्ह 2025’ ची औपचारिक घोषणा केली होती. ही कॉनक्लेव्ह येत्या 12 नोव्हेंबर 2025 रोजी यशोभूमी,सेक्टर-25, द्वारका, नवी दिल्ली येथे संपन्न होणार आहे.
या कॉनक्लेव्हचा मुख्य उद्देश म्हणजे भारतातील आदिवासी उद्योजकांना सक्षम करणे, समावेशक, नाविन्यपूर्ण आणि शाश्वत विकासासाठी आदिवासींना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणे हा आहे. भारताच्या विकासयात्रेत आदिवासी उद्योजकता ही एक परिवर्तनकारी टप्पा ठरणार आहे.
2025 हे वर्ष भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीचे वर्ष आहे. त्यांच्या स्वावलंबन, निष्ठा आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांमधून प्रेरणा घेऊन ही कॉनक्लेव्ह परंपरागत ज्ञान आणि आधुनिक उद्योजकतेची सांगड घालण्याचा प्रयत्न करते. या वर्षभर चालणाऱ्या राष्ट्रीय उपक्रमांद्वारे त्यांच्या स्मृतीस मानवंदना अर्पण केली जाणार आङे.
ही परिषद आदिवासी कार्य मंत्रालय, सांस्कृतिक मंत्रालय आणि DPIIT यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली जात आहे. MSME, कौशल्य विकास आणि उद्योजकता, वस्त्रोद्योग, DONER, MeitY, अन्न प्रक्रिया उद्योग, कृषी, आणि ग्रामीण विकास यांसारख्या प्रमुख मंत्रालयांचा सक्रिय सहभाग यामध्ये आहे. राज्य सरकारे स्थानिक उद्योजकतेच्या वाढीसाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
या कार्यक्रमासाठी FICCI, PRAYOGI (PanIIT Alumni Reach for Gram Udyogi) Foundation, आणि Startup India हे प्रमुख भागीदार म्हणून मार्गदर्शन, गुंतवणूक आणि इनक्यूबेशनसाठी साथ देत आहेत.
Roots to Rise (पिचिंग सत्र): आदिवासी उद्योजकांना त्यांच्या व्यवसाय कल्पना गुंतवणूकदार, CSR प्रतिनिधी, आणि शासकीय संस्थांपुढे सादर करण्याची संधी.
ज्ञान सत्रे: वित्त, ब्रँडिंग, नवकल्पना, आणि क्षमतावाढ यावर तज्ज्ञांद्वारे चर्चा आणि मास्टरक्लासेस.
CEO मंच: स्किलिंग, शाश्वतता, नवकल्पना आणि मार्केट अॅक्सेस यावर नेतृत्व चर्चा.
प्रदर्शन आणि पॅव्हिलियन्स: 100 हून अधिक आदिवासी स्टार्टअप्स आणि सूक्ष्म उद्योगांचे हस्तकला, कृषी उत्पादने, जंगलातील उत्पादन आणि हरित तंत्रज्ञानाचे प्रदर्शन.
Buyer–Seller बैठक: आदिवासी उत्पादक आणि खरेदीदार (कॉर्पोरेट/शासकीय) यांच्यात थेट भागीदारीची संधी.
या कॉनक्लेव्हद्वारे आदिवासी उद्योजकतेचा मुख्य प्रवाहात समावेश, स्वदेशी उत्पादने यांची ब्रँडिंग आणि बाजारपेठेत प्रवेश, आणि सात्यतपूर्ण शाश्वत व्यवसायवाढीसाठी क्षमता निर्मिती केली जाईल.
परंपरागत ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यवसाय धोरणांशी जोडून, स्थानिक नवोन्मेषाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मूल्यसाखळ्यांशी संलग्न करणे हेच या कॉनक्लेव्हचे मुख्य उद्दिष्ट आहे.
ही कॉनक्लेव्ह हे घोषित करते की, ‘विकसित भारत @2047’ ची कहाणी पूर्ण होईल तेव्हाच, जेव्हा देशातील शेवटचा उद्योजकही त्या विकासाचा भाग असेल.
भारत आता तयार आहे – ओळखीवर आधारित नवकल्पनांनी प्रेरित, समावेशक, शाश्वत आणि स्वावलंबी विकासाच्या दिशेने.
अधिक माहिती साठी भेट द्या:
🌐 https://tribalbusinessconclave.com