त्रिशा कृष्णनवर अश्लील टिप्पणी करणाऱ्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर मोठी कारवाई

अभिनेत्री त्रिशा कृष्णनबद्दल अश्लील टिप्पणी करणं माजी उपमुख्यमंत्र्यांना चांगलंच भोवलं आहे. त्यांना चेन्नई इथल्या निवासस्थानातून ताब्यात घेण्यात आलं आहे. तंजावरमधल्या सभेत त्यांनी थलपती विजय यांच्यावर निशाणा साधत असताना त्रिशाबद्दल दुहेरी अर्थाची टिप्पणी केली होती.

त्रिशा कृष्णनवर अश्लील टिप्पणी करणाऱ्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर मोठी कारवाई
थलपती विजय-त्रिशा कृष्णन, उदयनिधी स्टॅलिन
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 04, 2026 | 11:49 AM

अभिनेत्री त्रिशा कृष्णनवर दुहेरी अर्थाची अश्लील टिप्पणी करणारे तमिळनाडूचे माजी उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. तंजावरमध्ये कावेरी पाणी तंटासंदर्भात झालेल्या सभेत उदयनिधी यांनी त्रिशाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांना चेन्नईमधल्या नीलंकराई इथल्या त्यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेण्यात आलं आहे. सहपोलीस आयुक्त डॉ. पी. विजयकुमार यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने उदयनिधी यांना ताब्यात घेतलं आणि चौकशीसाठी पोलीस वाहनातून नेलं. या प्रकरणात अटकेची शक्यता वाटल्याने उदयनिधी यांनी अटकपूर्व जामिनासाठी मद्रास उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं. त्रिशाबद्दलच्या आक्षेपार्ह टिप्पणीनंतर टीव्हीकेकडून उदयनिधी यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.

नेमकं काय आहे प्रकरण?

उदयनिधी स्टॅलिन हे तंजावरमध्ये कावेरी पाणीप्रश्नाशी संबंधित आंदोलनाचं नेतृत्व करत होते. यावेळी सभेला संबोधित करताना स्टॅलिन यांनी थलपती विजय यांच्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. कावेरी पाणी प्रश्नाबद्दल उदयनिधी म्हणाले, “आमचे मुख्यमंत्री कावेरी पाणी प्रश्नावर तोंड उघडत नाहीत. त्यांना आमच्या पक्षावर खोटे खटले दाखल करण्याची जास्त चिंता आहे.” यावेळी गर्दीतून काही जणांना “त्रिशा, त्रिशा..” अशी घोषणाबाजी सुरू केली. तेव्हा उदयनिधी क्षणभर थांबले, हसले आणि मग टिप्पणी केली की, “पाणी इतरत्र पोहोचो किंवा न पोहोचो, तिथे मात्र पोहोचायला हवं. मला कावेरी म्हणायचं होतं.” हे ऐकताच लोकांनी जोरजोरात हसत टाळ्या वाजवल्या.

व्हिडीओ-

या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त करत टीव्हीकेनं उदयनिधी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे तंजावर पोलिसांनी उदयनिधी यांच्याविरोधात गटांमध्ये शत्रुत्व वाढवणं, माहिती तंत्रज्ञान कायद्यातील तरतुदी आणि तमिळनाडू महिला छळ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत एफआयआर नोंदवला. उदयनिधी यांची टिप्पणी अश्लील असल्याचा आरोप करत टीव्हीकेनं राष्ट्रीय महिला आयोगाकडेही धाव घेतली आहे. पक्षाने राष्ट्रीय महिला आयोगाला उदयनिधी यांच्या भाषणाचे व्हिडीओ फुटेज तपासून त्यांच्यावर कारवाईची शिफारस करण्याचं आवाहन केलं आहे.

तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अभिनेते थलपती विजय यांचं नाव अनेकदा अभिनेत्री त्रिशा कृष्णनशी जोडलं जातं. विजय यांच्या शपथविधी सोहळ्यातही त्रिशाच्या उपस्थितीने सर्वांचं लक्ष वेधलं होतं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us