विद्यापीठ अनुदान आयोगाची नेट परीक्षा जुलै आणि ऑगस्टमध्ये होणार; परीक्षेचा तपशील लवकरच यूजीसी जाहीर करणार

| Updated on: Jun 26, 2022 | 1:31 AM

डिसेंबर 2021 आणि जून 2022 मध्ये नेटच्या परीक्षेला विलंब झाला होता. त्या परीक्षेचे वेळापत्रक आता जाहीर करण्यात आले आहे. परीक्षेचा तपशील लवकरच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात येणार आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाची नेट परीक्षा जुलै आणि ऑगस्टमध्ये होणार; परीक्षेचा तपशील लवकरच यूजीसी जाहीर करणार
नेट परीक्षा होणार जुलै आणि ऑगस्टमध्ये
Image Credit source: UGC website
Follow us on

नवी दिल्ली: विद्यापीठ अनुदान आयोग (University Gants Commission) कडून घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता चाचणी (NET) परीक्षा जुलै आणि ऑगस्टमध्ये घेतली जाणार आहे. यूजीसीकडून घेण्यात येणाऱ्या या परीक्षेबाबती माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. याबाबतच ट्विटही करण्यात आले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून डिसेंबर 2021 आणि जून 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षांना (Exam) विलंब झाला होता. त्यामुळे आता नेट ही परीक्षा जुलै आणि ऑगस्ट महिन्यात टप्प्या टप्प्याने घेण्यात येणार आहे. त्याबाबतच्या तारखा ट्विटरच्या वरून सांगण्यात आल्या आहेत. जुलै महिन्यात होणाऱ्या नेट परीक्षेच्या तारीख या 8, 9, 11, 12 जुलै आणि 12, 13, 14 ऑगस्ट रोजी होणार आहेत.

जुलै-ऑगस्टमध्ये होणार परीक्षा

विद्यापीठ अनुदान आयोगाकडून नेट ही परीक्षा डिसेंबर 2021 आणि जून 2022 मध्ये घेण्यात आली नव्हती त्यामुळे या परीक्षेचे पुढील महिन्यातील तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. 8, 9, 11, 12 जुलै आणि 12, 13 आणि 14 ऑगस्ट ही परीक्षा होणार आहे. नेट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. विद्यापीठ आणि वरिष्ठ महाविद्यालयातील साहायक प्राध्यापक आणि संशोधनासाठी ही परीक्षी दिली जाते.

प्राध्यापक आणि संशोधनासाठी परीक्षा

नेट ही परीक्षा पदवीत्तर झाल्यानंतर विद्यार्थी मोठ्या प्रमाणात ही परीक्षा देत असतात. वरिष्ठ महाविद्यालय आणि  विद्यापीठ पातळीवर सहाय्यक प्राध्यापक आणि संशोधक सहाय्यक फेलोशिपसाठी ही परीक्षा दिली जाते.

परीक्षेचे तपशील लवकरच होणार जाहीर

पुढील महिन्यात होणाऱ्या या परीक्षांबाबतची सविस्तर माहिती लवकरच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात येईल असंही सांगण्यात आले आहे. यूजीसीकडून यापूर्वीच एप्रिल किंवा जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात या परीक्षेचे नियोजन करण्यात येणार होते, त्यावेळी वेळापत्रकात बदल झाल्याने आता ही परीक्षा पुढील महिन्यात घेण्यात येणार आहे.