
भारत आणि पाकिस्तान हे एकमेकांचे शेजारी देश आहेत. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या दोन्ही देशांचे एकमेकांशी वाद चालू आहेत. नुकतेच पहलगामवर दहशवतादी हल्ला झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले. भारताने ऑपरेशन सिंदूरअंतर्गत पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले होते. या हल्ल्यांच्या माध्यमातून भारताने दहशतवाद संपवण्याचा प्रयत्न केला आहे. असे असतानाच आता भारताने म्यानमारच्या सीमेवर असलेल्या दहशतवादालाही संपवण्यासाठी मोठा धडाकेबाज निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार भारतीय लष्कराने म्यानमारच्या सीमेवर ड्रोनच्या माध्यमातून हल्ले केले असून ULFA(I)या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांना लक्ष्य केलं आहे. तसा दावा ULFA(I) ने केला आहे. भारतीय लष्कराने मात्र अशा कोणत्याही प्रकारच्या हल्ल्याची आम्हाला कल्पना नाही असे म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मान्यमानरच्या सागिंग क्षेत्रात ULFA(I) नावाची दहशतवादी संघटना कार्यरत आहे. याच संघटनेने भारतीय सेनेने आमच्या शिबिरांवर ड्रोन हल्ले केल्याचा दावा केला आहे. ULFA(I) या संघटनेच्या दाव्यानुसार या ड्रोन हल्ल्यांत एका वरिष्ठ नेत्यासह एकूण 19 लोक जखमी झाले आहेत. भारताच्या संरक्षण दलाचे प्रवत्यांनी मात्र आम्हाला या घटनेबाबत कोणताही माहितीन नाही, असे सांगितले आहे. भारतीय लष्कराने ड्रोन हल्ल्यासारख्या कोणत्याही ऑपरेशनची आम्हाला माहिती नाही, असे म्हटले आहे. विशेष म्हणजे ULFA(I) या संगटनेने भारताच्या ड्रोन हल्ल्यात आमचा एक वरिष्ठ नेताही मारला गेल्याचा दावे काला आहे.
ULFA(I) या संघटनेनुसार त्यांच्या अनेक वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या शिबिरांवर ड्रोन हल्ले करण्यात आले आहेत. या बंदी असलेल्या संघटनेचा एक वरिष्ठ नेतादेखील मारला गेल्याचा दावा केला जातोय. तर अन्य 19 जण जखमी झाले आहेत ULFA(I) संघटनेच्या दाव्यावर लेफ्टनंट कर्नल महेंद्र रावत यांनी मात्र भारतीय लष्कराकडे अशा प्रकारच्या कोणत्याही ऑपरेशनची माहिती नाही, असे स्पष्टीकरण दिले आहे.
युनायटेड लिबरेशन फ्रँट ऑफ आसा अर्थात ULFA(I) ही एक प्रमुख दहशतवादी संघटना आहे. या संघटनेची स्थापना 1979 साली करण्यात आली होती. परेश बरुआ नावाच्या व्यक्तीने आपल्या काही सहकाऱ्यांना सोबत घेत या संघटनेची स्थापना केली होती. सशस्त्र लढा उभारून आसाम राज्याला स्वायतत्ता मिवळून देणे, हा या संघटनेचा मुख्य उद्देश आहे. केंद्र सरकारने 1990 साली या संघटनेवर बंदी घातली होती.
याच संघटनेशी संबंधित असलेला नेता अरबिंद राजखोवा याला बांगलादेशमधून अटक करण्यात आली होती. बांगलादेशमधून अटक करून त्याला भारतात आणण्यात आले होते.