AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UCC ला NDA मधूनच विरोध? मित्र पक्षांनी वाढवले भाजपचे टेन्शन, म्हटले काय?

Uniform Civil Form NDA: 2029 पूर्वी देशातील 21 भाजप-एनडीए शासित राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याचा मानस देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला आहे. त्यावर आता NDA मधील मित्र पक्षांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यातील काहींचा सूर थोडा वेगळा असल्याचे म्हटले जात आहे.

UCC ला NDA मधूनच विरोध? मित्र पक्षांनी वाढवले भाजपचे टेन्शन, म्हटले काय?
समान नागरी कायदा
| Updated on: Sep 15, 2026 | 9:41 AM
Share

2029 पूर्वी देशातील 21 भाजप-एनडीए शासित राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याचा मनोदय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला. पण त्यानंतर भाजपच्या तीन घटक दलांनी त्यावर अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली. तेलुगु देशम पार्टीचे(TDP), जनता दला संयुक्त(JDU) आणि लोक जनशक्ती पक्षाने (रामविलास) थोडी सावध भूमिका घेतली आहे. यामुळे समान नागरी कायद्याविषयी घटक पक्षाचा थोडा वेगळा सूर असल्याचे दिसून आले.

JDU – TDP ची भूमिका काय?

भाजपच्या नेतृत्वातील NDA ला संसदेत बहुमत आहे. त्यातील सर्वात मोठा पक्ष तेलुगु देशम पार्टीने युसीसी मुद्यावर सरकारला समर्थन दिले आहे. पक्षाचे लोकसभेतील नेते लावू कृष्ण देवरायालू यांनी युसीसीला पाठिंबा जाहीर केला असला तरी पक्षातंर्गत अजून त्यावर चर्चा व्हायची असल्याचे म्हटले आहे. जोपर्यंत पक्षातंर्गत चर्चा होत नाही, तोपर्यंत याविषयावर अधिक बोलण्यास त्यांनी नकार दिला. 2024 मधील लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान एनडीएमध्ये सहभागी होण्यापूर्वी चंद्रबाबू नायडू यांनी युसीसी मुद्यावर TDP मुस्लिम हितांचा विचार करेल असे म्हटले होते.

तर बिहारमधील नितीश कुमार यांची JDU ने राष्ट्रीय स्तरावर युजीसी लागू करण्यास पाठिंबा दिला असला तरी बिहारमध्ये हा कायदा लागू करण्याच्या बाजूने नाही. पक्षाचे नेते श्याम रजक यांनी सोमवारी याविषयीची भूमिका जाहीर केली. पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष संजय झा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे म्हटले आहे.

तर अजून एक सहकारी पक्ष लोक जनशक्ती पार्टीने (रामविलास) चिराग पासवान यांनी सुद्धा सावध भूमिका घेतली. चिराग पासवान यांनी पक्ष हा देशातील एकरुपतेसोबतच विविधता जपण्यासाठी सुद्धा कटिबद्ध असल्याचे वक्तव्य केले. पासवान यांनी युसीसीवर सावध भूमिका घेतल्याचे दिसले. युसीसीचा प्रस्ताव सार्वजनिक करण्याची मागणीही त्यांनी केली.

तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि हिंदुस्तानी अवाम मोर्चा(सेक्युलरने) युसीसीसाठी केंद्र सरकारला बिनदिक्कत पाठिंबा जाहीर केला. युसीसी समानता, न्याय आणि राष्ट्रीय एकतेसाठी आवश्यक असल्याचे मत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मांडले. तर HAM चे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष कुमार सुमन यांनी शाह यांच्या वक्तव्याला संपूर्ण पाठिंबा असल्याचे म्हटले आहे.

21 राज्यांचे पाठबळ

देशातील 21 राज्यांमध्ये एनडीएचे सरकार आहे. या ठिकाणी हा कायदा मंजूर होण्याची आशा त्यांनी व्यक्त केली. उत्तराखंड या भाजप शासित राज्यात अगोदरच समान नागरी कायदा लागू झाला आहे. तर महाराष्ट्रातही हा कायदा लागू करण्याच्या दृष्टीने सरकारने पाऊल टाकले आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात याविषयीचा कायदा मंजूरीसाठी विधिमंडळात येऊ शकतो.

Follow Us
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णायक सुनावणी? शिंदेंचे वकील करणार...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णयाक सुनावणी... शिंदेंचे वकिल करणार युक्तिवाद
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी