इथेनॉल प्रोडक्शनमध्ये आहे नितिन गडकरी यांची थेट भागीदारी, स्वत: सांगितले किती..

इथेनॉल इंधनाबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला. मात्र, याबाबात मोठा मुद्दा उपस्थित झाला. त्यातच केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी एक चॅलेजच दिले होते. आता नुकताच नितिन गडकरी यांनी इथेनॉलच्या प्रोडक्शनमध्ये त्यांचा हिस्सा नक्की किती आहे हे सांगून टाकले.

इथेनॉल प्रोडक्शनमध्ये आहे नितिन गडकरी यांची थेट भागीदारी, स्वत: सांगितले किती..
Nitin Gadkari
| Updated on: Jul 09, 2026 | 9:50 AM

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरच्या एका कार्यक्रमात बोलताना घोषणा केली होती की, केंद्र सरकारने 100% इथेनॉल इंधनाला हिरवा कंदील दाखवला आहे. तसा आदेशही केंद्र सरकारने काढला. इराण आणि अमेरिका युद्धात पेट्रोलचे दर सातत्याने वाढताना दिसले. पुन्हा एकदा त्यांच्यात संघर्ष पेटला आहे. ज्याचा परिणाम कमी झालेले कच्च्या तेलाचे दर पुन्हा एकदा वाढले आहेत. जागतिक बाजारात पुन्हा एकदा मोठा भूकंप आला. कच्च्या तेलाचे दर वाढल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. भारत पेट्रोल-डिझेलकरिता खाडी देशांवर अवलंबून आहे. पेट्रोल आणि डिझेलचा पर्याय इथेनॉल आहे. याबाबत केंद्र सरकारकडून मोठी पाऊलेही उचलली जात आहेत. इथेनॉलच्या वापराकरिता केंद्रीय मंत्री नितिन गडकरी आग्रही आहेत.

काही लोक इथेनॉलच्या वापराकरिता विरोध करत आहेत. आता यावरच नितिन गडकरी यांनी अत्यंत मोठे विधान केले. इथेनॉलच्या चर्चांवर नितिन गडकरी यांनी स्पष्ट केले की, यामधून ते खास आर्थिक लाभ उचलत नाहीत. इथेनॉलच्या प्रोडक्शनमध्ये त्यांची खूप छोटी हिस्सेदारी आहे. एका मुलाखतीमध्ये बोलताना नितिन गडकरी यांनी म्हटले की, इथेनॉलने चालणाऱ्या गाड्यांना कोणत्याही समस्येची बातमी नाहीये.

इथेनॉल पॉलिशीने मला काहीच मिळत नाहीये. इथेनॉल प्रोडक्शनमध्ये माझी भागीदारी फक्त 0.07 टक्के आहे. इतक्या छोट्याशा भागीदारीमध्ये कोणत्याही मोठ्या आर्थिक लाभाचा प्रश्नच उठत नाही. इथेनॉल पॉलिशी मी माझ्या फायद्यासाठी तयार केली, हा आरोप खोटा आहे. मी फक्त इथेनॉलवरच बोलत नाही. मी इंधनाच्या पर्यायांवर बोलतो. इथेनॉलच्या वापराने फायदा होणार आहे.

इथेनॉलचा निर्णय मी काही एकट्याने घेतला नाही. पुर्ण पेट्रोलियम मंत्रालय, कॅबिनेट आणि साइंटिफिक रिसर्चनंतर हा निर्णय घेण्यात आला. इथेनॉल हे मक्क्यापासून तयार होते. उत्तर प्रदेश आणि बिहारच्या शेतकऱ्यांना 45000 करोड अतिरिक्त रक्कम देण्यात आली. यासोबतच मंगळवारी नितिन गडकरी यांनी इथेनॉलमुळे खराब झालेली गाडी दाखवा असे चॅलेंज दिले होते. मात्र, एकही तसे प्रकरण पुढे आले नाही.

Follow Us