पुन्हा देश हादरला! अचानक हेलिकॉप्टरच्या केबिनमध्ये धुराचे लोट, उड्डाण घेताच डेंजर, उपमुख्यमंत्री थोडक्यात बचावले

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या हेलिकॉप्टरचे लखनऊ विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. कौशांबीला जाताना हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने विमान तातडीने लँड करण्यात आले.

पुन्हा देश हादरला! अचानक हेलिकॉप्टरच्या केबिनमध्ये धुराचे लोट, उड्डाण घेताच डेंजर, उपमुख्यमंत्री थोडक्यात बचावले
उपमुख्यमंत्री
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Mar 07, 2026 | 12:28 PM

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. अचानक विमानात बिघाड झाल्यामुळे लँडिंग दरम्यान विमान झुकले आणि जमीनीवर कोसळले. या घटनने संपूर्ण देश हादरला होता. आता उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या हेलिकॉप्टरचे आज बिघड झाला. त्यानंतर अचानत लखनऊ विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. कौशांबीला जात असताना हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला, डिस्प्ले बंद पडला आणि केबिनमध्ये धूर झाला. सुदैवाने, उपमुख्यमंत्री आणि सर्व सुरक्षा कर्मचारी सुरक्षित आहेत.

नेमकी घटना काय घडली?

उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य लखनऊहून कौशांबीला जाण्यासाठी हेलिकॉप्टरने निघाले होते. प्रवासादरम्यान हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याचे लक्षात आले. सुरक्षिततेचा विचार करून लखनऊ विमानतळावर तातडीने लँडिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला. लँडिंगच्या वेळी संपूर्ण हेलिकॉप्टरमध्ये धुराचा लोट होता. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

सर्व जण सुरक्षित, तपास सुरू

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरमधील सर्व प्रवासी सुरक्षित असून कोणालाही दुखापत झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि सुरक्षा दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. तांत्रिक पथक (Technical Team) हेलिकॉप्टरमध्ये नेमका बिघाड कशामुळे झाला? याचा तपास करत आहे.

रस्ते मार्गाने कौशांबीकडे रवाना

आज ७ मार्च रोजी उपमुख्यमंत्री मौर्य यांचा कौशांबी दौरा नियोजित आहे. हेलिकॉप्टरमधील बिघाडामुळे आता ते रस्ते मार्गाने कौशांबीकडे रवाना झाले आहेत. ते तिथे खालील कार्यक्रमात सहभागी होणार आहेत:

स्थळ: बाबू सिंह डिग्री कॉलेज मैदान, सयारा.

कार्यक्रम: दोन दिवसीय ‘सरस महोत्सव’ चे उद्घाटन.

उद्देश: ग्रामीण उपजीविका आणि महिला सक्षमीकरणाला चालना देणे.

विमानतळावर सुरक्षा व्यवस्था

इमर्जन्सी लँडिंगच्या वेळी विमानतळावर सुरक्षेचे चोख बंदोबस्त ठेवण्यात आले होते. हेलिकॉप्टर जमिनीवर उतरताच तांत्रिक पथकाने त्याला वेढले आणि उपमुख्यमंत्र्यांना सुरक्षित बाहेर काढले. सध्या या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी केली जात आहे.

Follow Us