देशातल्या पॉवरफुल मुख्यमंत्र्यांचाही जेव्हा कलेक्टर, कमिश्नर फोन उचलत नाहीत!

| Updated on: Mar 16, 2021 | 3:01 PM

देशातलं सर्वात मोठं राज्य असलेल्या आणि पॉवरफुल मुख्यमंत्री असलेल्या योगी आदित्यनाथ यांचा कलेक्टर, कमिश्ननर, एसपी आणि एसएसपीही फोन उचलत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. (up government sent notice to several ias officers for not pick phone)

देशातल्या पॉवरफुल मुख्यमंत्र्यांचाही जेव्हा कलेक्टर, कमिश्नर फोन उचलत नाहीत!
yogi adityanath
Follow us on

लखनऊ: देशातलं सर्वात मोठं राज्य असलेल्या आणि पॉवरफुल मुख्यमंत्री असलेल्या योगी आदित्यनाथ यांचा कलेक्टर, कमिश्ननर, एसपी आणि एसएसपीही फोन उचलत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मुख्यमंत्र्यांचा फोन न उचलणाऱ्या या सरकारी बाबूंना कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आली असून त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागण्यात आलं आहे. (up government sent notice to several ias officers for not pick phone)

मुख्यमंत्र्यांचा फोन उचलत नसल्याबद्दल प्रशासनाने 25 डीएम, चार कमिश्नर यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली असून त्यांना तीन दिवसात उत्तर देण्यास सांगितलं आहे. वाराणसी, प्रयागराज, अयोध्या आणि बरेलीच्या कमिश्नरला या नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी आणि कमिश्नर सरकारी फोन उचलत नसल्याच्या तक्रारी मुख्यमंत्र्यांकडे वारंवार येत होत्या. त्यामुळे अखेर प्रशासनानेही ही अॅक्शन घेतली आहे.

मुख्यमंत्र्यांनी स्वत: खात्री केली

जिल्हाधिकारी आणि कमिश्नर फोन उचलत नसल्याच्या तक्रारी आल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी आपल्यासमोरच सर्वांना फोन लावण्यास सांगितलं. त्यातील अनेकांनी फोनच उचलला नाही. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची खात्री पटली आणि त्यांनी संबंधितांना नोटीस पाठवण्याचे आदेश जारी केले.

डीएम आणि एसएसपींनाही नोटीस

ज्या जिल्ह्यातील डीएमने फोन उचलला नाही, त्यामध्ये गौतमबुद्ध नगर, गाजियाबाद, बदायूँ, अलीगड, कन्नौज, संत कबीर नगर, सिद्धार्थ नगर, गोरखपूर, फिरोजाबाद, हापूड, अमरोहा, पीलीभीत, बलरामपूर, गोंडा, जालौन, औरैया, कानपूर देहात, कानपूर झांसी, मऊ, आजमगड, वाराणासी, प्रयागराज, अयोध्या आणि बरेलीचा समावेश आहे. त्याशिवाय आग्रा मंडलच्या कोणत्याही एसपी-एसएसपीनेही मुख्यमंत्र्यांचा फोन उचलला नाही. अलीगड, प्रयागराज, कानपूर नगर, रायबरेली, कनौज, औरया, कुशीनगर आणि जालौनच्या एसएसपीने फोन उचलला नसल्याने त्यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. (up government sent notice to several ias officers for not pick phone)

 

संबंधित बातम्या:

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि लसीकरणाबाबत पंतप्रधानांनी बोलावली बैठक, पुढील रणनिती ठरणार

दहशतवादी आरिज खानला फाशीची शिक्षा, दिल्लीच्या साकेत कोर्टाचा मोठा निकाल

मराठा समाज मागास आहे का?; वाचा, सुप्रीम कोर्टात आज नेमकं काय घडलं?

(up government sent notice to several ias officers for not pick phone)